Notice to Bus Driver Dainik Gomantak 
गोवा

Goa News: चालकाला निष्काळजीपणा भोवला

कारणे दाखवा नोटीस: डिझेल न भरताच नेली ‘कदंब’ची बस

दैनिक गोमन्तक

पणजी: आज सकाळी फोंड्याहून केरी आणि सावईवेरे येथे जाणारी कदंब महामंडळाची बस अचानक बंद पडली. या बसमध्ये नोकरीला व्यवसायासाठी जाणारे अनेक प्रवासी होते. चालकाने पाहणी केली असता, टाकीत डिझेल नसल्याचे दिसून आले. चालकाच्या निष्काळजीपणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याची दखल घेऊन महामंडळाच्या अध्यक्षांनी त्याला त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

बस बंद पडल्याने प्रवाशांना कामावर वेळेवर पोहचण्यास विलंब झाल्याने ते संतापले. बस बंद पडण्यामागील कारण शोधताना चालकाने एक काठी घेऊन डिझेलच्या टाकीत घातली व डिझेल किती आहे याचा अंदाज घेतला. यावेळी टाकीमध्ये डिझेलच नसल्याचे लक्षात आले. प्रत्येक बसचालकाने प्रवासाला निघताना टाकीमध्ये डिझेल पुरेसे आहे का, याची खात्री केल्यानंतरच बस न्यावी, अशी ताकीद अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली आहे.

व्हायरल व्हिडिओची अध्यक्षांकडून दखल

यासंदर्भात माहिती देताना महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार तुयेकर म्हणाले की, प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे. चांगली सेवा दिलीच तर प्रवासी कदंब बसमधून प्रवास करतील. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. लोकांना नाहक त्रास होणार नाही यासाठी बसचालकांनी अधिक दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. बसमधील डिझेल संपल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो पाहून त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या चालकाविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे तुयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT