अभंग स्पर्धा Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील हर्षा, ओंकार, गार्गी अभंग स्पर्धेत प्रथम

पुरुष गटात पाच हजार रुपयांचे बक्षीस कुंकळी येथील ओंकार च्यारी यांनी पटकावले.

दैनिक गोमन्तक

वास्को: ‘केडीआर बॉयस् ऑफ आरपोरा’ने कै. वासुदेव रेडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित तिस-या अखिल गोवा अभंग गायन स्पर्धेचा निकाल सोमवारी (4 एप्रिल) जाहीर करण्यात आला. त्यामध्ये महिला गटात वाळपई येथील हर्षा गणपुले हिने प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयांचे पारितोषिक, चषक व प्रशस्तीपत्र पटकावले. पुरुष गटात पाच हजार रुपयांचे बक्षीस कुंकळी येथील ओंकार च्यारी यांनी पटकावले. तर पंधरा वर्षाखालील मुलांमुलींच्या स्पर्धेत गार्गी सिद्धये हिने पहिले बक्षीस पटकावले.

महिला गटात स्पर्धेचे दुसरे बक्षीस दिशा कुर्टीकर भोम हिला प्राप्त झाले तर तिसरे हेडलॅन्ड सडा वास्को येथील सेजल सगुण नाईक हिने प्राप्त केले. उत्तेजनार्थ हजार रुपयांची बक्षिसे अनुक्रमे रुपाली खोत, नुतन रेवोडकर व चैताली परब यांना देण्यात आली.

पुरुष गटात दुसरे बक्षीस सुरज शेटगांवकर यानी मिळवले, तिसरे वास्को येथील नवाब शेख यांना प्राप्त झाले, तर उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपयांची बक्षिसे अनुक्रमे यशवंत नाईक, ज्ञानेश्वर गांवस वाळपई व विवेक नाईक गावणे फोंडा यांनी मिळवली.

लहान गटात म्हणजे पंधरा वर्षाखालील मुलांमुलींच्या स्पर्धेत दुसरे बक्षीस मनस्वी विशाल खोत हिने पटकावले तर तिसरे बक्षीस प्रभाकर उर्फ वेद वेर्लेकर याला प्राप्त झाले. उत्तेजनार्थ अनुक्रमे उर्वशी उल्हास नाईक, खुष पेडणेकर व मुद्रा सरोज दिवकर यांना मिळाली.

स्पर्धेचे परीक्षण संगीत शिक्षक राया कोरगांवकर व गायक कलाकार सुमेधा देसाई यांनी केले. सूत्रसंचालन संतोष मोरुडकर यांनी केले. बक्षीस वितरणप्रसंगी व्यासपीठावर स्पर्धा आयोजक रोशन रेडकर, सरपंच श्रीकृष्णा नागवेकर, पंच राजेश मोरजकर, उपसरपंच वायोलेंटा डिसोझा, सलीम सय्यद, माजी सरपंच आगुस्तिन डिसोझा, सुषमा नागवेकर, जयदीप गाड, सुनिल रेडकर तसेच प्रशांत रेडकर, विश्वास प्रभू व इतर सर्व सभासद उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

SCROLL FOR NEXT