Praveen Vaigankar Dainik Gomantak
गोवा

वीज मंत्र्यांनी लक्ष घालूनही हरमल पंचायत क्षेत्र अंधारातच !

हरमल पंचायत (Harmal Panchayat) क्षेत्रात विजेची समस्या गंभीर आहे. वीज मंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हि समस्या सोडवावी काही ठिकाणी वीज खांबावरील दिवे पेटत नाही.

Manish Jadhav

हरमल पंचायत (Harmal Panchayat) क्षेत्रात विजेची समस्या गंभीर आहे. वीज मंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हि समस्या सोडवावी काही ठिकाणी वीज खांबावरील दिवे पेटत नाही. स्थानिक वीज कर्मचारी यांनी कोणत्या खांबावर विजेचे दिवे पेटत नाही याची पूर्ण माहिती आहे , सरकारने लक्ष देवून हि समस्या सोडवावी अन्यथा वीज अभियात्याना घेराव घालण्याचा इशारा मगोचे कार्यकर्त्ये तथा हरमलचे स्थानिक पंच सदस्य प्रवीण व्हायगणकर (Praveen Vaigankar) यांनी दिला आहे.

16 मे रोजी चक्रीवादळ आले त्यावेळी मोठ्या प्रमाणात विजेची व इतर विभागाची सरकारी मालमत्तेची हानी झाली , त्या काळात पाच दिवस वीज गायब होती , त्या काळातील समस्या समजू शकतो , परतू अश्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्षम बनवायला हवी दीड महिना लोटला तरीही विजेच्या लपंडावात काही बदल झाला नाही , आजही वारंवार विजेचा लंपडाव सुरु असतो , त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली.

रुपेश नाईक

हरमल येथील स्थानिक रहिवासी रुपेश नाईक यांनी प्रतिक्रिया देताना स्थानिक वीज कर्मचारी काही काही वेळी जर वीज गेली ती दुरुस्ती करण्यासाठी बोलावले तर जास्त भाव खातात , अश्या कामचुकार कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी समज द्यावी अशी मागणी रुपेश नाईक यांनी केली हरमल परिसरात एखाद्या ग्राहकाने दोन महिन्याची वेळेवर जर वीज बिले भरली नाही तर त्याचा वीज प्रवाह खंडित केला जाता , आणि बिल भरल्यानंतर परत वीज प्रवाह जोडण्यासाठी विनंती केली कि स्थानिक वीज कर्मचारी अनेक वेळा सांगूनही येत नाहीत.

मगोचे समर्थक प्रवीण आर्लेकर यांनी पुढे माहिती देताना हरमल भागात वीज पुरवठा केरी फिडरवरून देण्यात आला आहे, आणि या फिडरवरील वाहिन्या ह्या जंगलातून आल्या आहेत . एखाद्या वेळी वीज प्रवाह खंडित झाला तर राना वनातून काट्या कुट्यातून वीज वाहिन्या कुठे बिघाड झाला हे कर्मचाऱ्यांना पहावे लागते. कमी कर्मचारी असल्याने जे मोजकेच कर्मचारी असतात त्यांच्यावर कामाचा ताण वाढत असतो. जो पर्यंत किनारी भागातील वीज वाहिन्या भूमिगत होत नाही तो पर्यंत हि समस्या कायमच असणार आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT