Water Shortage Dainik Gomantak
गोवा

Water Shortage: गोव्यात ऐन नाताळच्या सणात हरमल भागातील लोकांचे पाण्यासाठी हाल

Water Shortage: गोवा खालचावाडा भागात गेले आठ दिवस पाण्याचा थेंब नाही.

दैनिक गोमन्तक

Water Shortage: हरमल येथील किनारी भागात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने ऐन ख्रिसमसच्या सणात ग्रामस्थांचे बरेच हाल झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः खालचावाडा भागात गेले आठ दिवस पाण्याचा थेंब मिळाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. चांदेल व अन्य ठिकाणी होणारी टंचाई किनारपट्टी भागात प्रामुख्याने का जाणवते असा सवाल आहे.

तिलारी कालवा नादुरुस्त झाल्याने ग्रामीण भागात टंचाई होते. मात्र, शहरी भागांतील मोठ्या वस्त्यांना पाण्याची सोय केली जाते, याबाबत खात्याने स्पष्टीकरण द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, नानोस्करवाडा उपनदीबाबत खात्याने शुद्धीकरण व अन्य प्रक्रिया केल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही व त्या शुद्ध पाण्याचा लाभ उपेक्षित घटकांना मिळू शकतो.

बुस्टर पंपबाबत खात्याचे ठोस धोरण नसल्याने पाण्याची चोरी नित्य होत असल्याने खात्याच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. पाणी चोरी करून बिले अनियमित भरून खात्याला वेठीस धरतात तर विनापंप मिळणारे पाणी व त्याची बिले प्रामाणिकपणे भरणाऱ्या लोकांना पाणी टंचाई भेडसावते.

नागरिकांनी बिले का भरावीत असा सवाल व्यक्त होत आहे. पुरवठा खात्याने पाणी पुरवठ्याबाबत गंभीरपणे लक्ष घालून ग्रामीण भागातील वितरणात नियोजन केल्यास तीव्रता जाणवणार नाही, अशी मागणी होत आहे.

उदय गवंडी, माजी सरपंच

पालये पंचायत क्षेत्रातील मधलावाडा, नबावाखानवाडा आदी भागांत पाण्याची तीव्र टंचाई होत आहे. पाण्याची समस्या ही दोन महिन्यापुरती नसून अलिकडे डिसेंबर महिन्यापासून सुरू होत आहे. खात्याकडून उपाययोजना होत नाही. पालये भागात अनेक ठिकाणी पाण्याचे झरे व नाले आहेत. त्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुरवठा होऊ शकतो का याची चाचपणी केली पाहिजे.

जित आरोलकर, आमदार, मांद्रे मतदारसंघ-

संस्थेच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करून सामान्य लोकांना मदतीचा हात देत असल्याने समाधान वाटते. अरुंद रस्ता व उंच भागात नागरिकापर्यत टँँकर पोचत नसल्याने थोडीशी गैरसोय होत असल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT