Har Ghar Tiranga | Goa CM Pramod Sawant  CM Twitter
गोवा

Har Ghar Tiranga: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे नागरिकांना खास आवाहन

मागील वर्षापासून देशात हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Har Ghar Tiranga: भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मागील वर्षापासून देशात हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रत्येकाला त्याच्या घरी तिरंगा फडकवता येणार आहे. यासाठी घरावर तिरंगा फडवण्याचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचा तसेच, सोशल मिडिया अकाउंटचा डिपी बदलण्याचे आवाहन केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केलंय.

भारतीय तिरंगा मनात अभिमानाची भावना निर्माण करतो, स्वातंत्र्यसैनिक, संरक्षण दलाच्या बलिदानाचे स्मरण करतो आणि देशाना मान उंचवण्यासाठी सदैव प्रेरणा देतो. 13 ते 15 ऑगस्ट या काळात आपण सर्वांनी आपल्या घरोघरी राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावू या.

तिरंग्यासोबत सेल्फी घेऊन ती harghartiranga.com वर अपलोड करावी असे आवाहन देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत सर्वांना सोशल मिडिया अकाउंटचा डिपी बदलण्याचे आवाहन केले. मोदींच्या या ट्विटला रिट्विट करत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सवंत यांनी देखील हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2023ला ऐतिहासिक लाल किल्यावरुन 77व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा  प्रारंभ करतील. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्यावरून राष्ट्राला संबोधित करतील.

या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा समारोप  होणार आहे. 12 मार्च 2021ला अहमदाबाद मध्ये साबरमती आश्रमातून पंतप्रधानांनी याचा प्रारंभ केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT