Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: ‘म्हादई जागोर’सह ‘हात से हात जोडो’ अभियान

गोवा काँग्रेसतर्फे 100 दिवस मोहीम- प्रत्येक मतदारसंघात जागृती करणार

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: प्रदेश काँग्रेसतर्फे ‘म्हादई जागोर'' ही मोहीम सुरूच आहे. त्याच्या जोडीला आता ‘हात से हात जोडो’ या अभियानाची सुरुवात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पणजीतील आझाद मैदानावरून झाली. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निरीक्षक डॉ. एस. सैलजनाथ, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार फ्रान्सिस्को सार्दिन व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

"हात से हाथ जोडो" आणि "म्हादई जागोर" मोहिमेची सुरुवात पणजी येथील ऐतिहासिक आझाद मैदानावर करण्यात आली. 100 दिवस चालणारी ही मोहीम गोव्यातील प्रत्येक मतदारसंघातील कॉंग्रेस गट राबविणार आहेत.

त्यानिमित्त म्हादईचे जल कलशाद्वारे गोवाभर फिरवण्यात येणार आहे. त्याबाबत प्रत्येक गटामध्ये हे अभियान चालविले जाणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. 30 जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने हातात तिरंगा घेऊन अभियानात सहभागी व्हायचे आहे.

पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्‍मीर अशी भारत जोडो यात्रा काढलेली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काढलेली ही यात्रा नाही.

परंतु देशातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या मनात असलेली निराशा दूर करण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून झाली आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी हात से हात जोडो हे अभियान राबविले जात आहे. त्याचा प्रारंभ 26 तारखेपासून करण्यात आला असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, वाळपई काँग्रेस नेत्या मनीषा उजगावकर, दक्षिण गोवा संयोजक सुभाष फळदेसाई, उत्तर गोवा संयोजक विजय भिके यांनीही या सभेला मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT