Casino Dainik Gomantak
गोवा

Panjim Casino: म्हणे मी उपजिल्हाधिकारी! गुजरातमधील व्यक्तीने पणजीतील कॅसिनोला घातला 10 लाखांचा गंडा

संशयित गोपालने तो उपजिल्हाधिकारी असल्याचे भासवून बिग डॅडी कॅसिनोतून 10 लाखांचे गेम्ब्लिंग चिप्स घेतले.

Pramod Yadav

Panjim Casino: गुजरातमधील व्यक्तीने पणजीतील एक कॅसिनोला दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

संशयित व्यक्तीने तो उपजिल्हाधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याचे समोर आलंय. या व्यक्तीविरोधात पणजीतील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल पटेल (रा. गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गोपालने तो उपजिल्हाधिकारी असल्याचे भासवून बिग डॅडी कॅसिनोतून 10 लाखांचे गेम्ब्लिंग चिप्स घेतले, चिप्स परत न देता संशयित गोपलने कॅसिनोची फसवणूक केली, असे दाखल तक्रारीत म्हटले आहे.

यापूर्वीही कॅसिनोत फसवणुकीचा प्रकार आला होता समोर

काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्याने खोटा गेम रिपोर्ट सादर करुन गेस्टला 1.70 लाखांचा बोनस मिळवून दिल्याचा प्रकार 'बिग डॅडी' कॅसिनोत घडला होता.

याप्रकरणी कॅसिनो कर्मचारी दीपक दास (रा. मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती.

तसेच, डिसेंबरमध्ये निओ मॅजेस्टिक कॅसिनोमधून 13 लाख रूपयांच्या चिप्स चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी सुनील कुमार आणि के. डी. ठकराल या दोघांना अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT