Gujarati tourist arrested in Goa Dainik Gomantak
गोवा

गुजराती पर्यटकाला गोव्यात अटक

त्याने दक्षिण गोव्यात फिरणे पसंत केले

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात गुजरात (Gujrat) येथील राजीव अंजुरकर या 35 वर्षीय पर्यटकाने (Tourist) कोलवा (Colva Beach) येथे स्कुटर चोरली. ही स्कुटर चोरून तो बिचवर फिरत असताना कोलवा पोलिसांनी (Police) त्याला अटक केली.

निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोद्रा गुजरात येथे राहणारा राजीव आपल्या अन्य एका मित्रांबरोबर गोवा फिरण्यासाठी आला होता. त्याचा दुसरा मित्र उत्तर गोव्यात फिरायला गेला असता राजीवने दक्षिण गोव्यात फिरणे पसंत केले होते. कोलवा परिसरात फिरत असताना एका एटीएमकडे एक ज्युपिटर स्कुटर पार्क करून ठेवलेली दिसली. स्कुटर मालकाने चावी गाडीलाच लावून ठेवली होती. त्याचा फायदा उठवून तो ती स्कुटर घेऊन फरार झाला.

सदर स्कुटर कोसेसाव डिसिल्वा या 73 वर्षीय स्थानिक तियात्रिस्ताच्या मालकीची होती. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला होता. त्याने आपली स्कुटर चोरल्याची वर्दी दिल्यावर पोलिसांनी सगळीकडे स्कुटरचा फोटो आणि नंबर प्लेट पाठवून दिली आणि शोध सुरू केला. वाडी बाणावली येथील बीचवर तो त्या स्कुटरवरून फिरत असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

सध्या पोलिस या पर्यटकाची पार्श्वभूमी तपासून पाहत असून त्याने गुजरातमध्येही आशा चोऱ्या केल्या आहेत का? याची चौकशी चालू आहे. राजीव व त्याचा मित्र गोव्यात फिरायला आले होते, की चोरीच्या उद्देशाने याचाही तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT