Guided goan players by Pro Kabaddi coaches Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या खेळाडूंना ‘प्रो-कबड्डी’ प्रशिक्षकाचे मार्गदर्शन

राष्ट्रीय सीनियर स्पर्धा : खेळाडू मेरठला रवाना, ‘यूपी योद्धा’चे जसवीर देणार धडे

Kishor Petkar

पणजी : गोव्याच्या सीनियर पुरुष कबड्डी संघाची आगामी राष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी चांगली व्हावी या उद्देशाने गोवा कबड्डी संघटनेने मुख्य प्रशिक्षकपदी प्रो-कबड्डी लीगमधील मार्गदर्शकाची नियुक्ती केली. यूपी योद्धा संघाचे प्रशिक्षक जसवीर सिंग राज्यातील कबड्डीपटूंना मेरठ येथील सराव शिबिरात धडे देतील.

(Guided goan players by Pro Kabaddi coaches)

गोव्याच्या सीनियर पुरुष कबड्डी संघातील सदस्य शनिवारी रेल्वेमार्गे मेरठला रवाना झाले. तेथे ते 4 ते 18 जुलै या कालावधीत यूपी योद्धा अकादमी संकुलात सराव करतील.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाची 69वी राष्ट्रीय सीनियर पुरुष कबड्डी स्पर्धा हरियानातील चरखी दादरी येथे 21 ते 24 जुलै या कालावधीत खेळली जाईल. स्पर्धा मॅट्सवर होईल. गोव्याचा संघ मेरठ येथून परस्पर राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाईल.

जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील यूपी योद्धा संघाने गतवेळच्या प्रो-कबड्डी स्पर्धेत प्ले-ऑफ फेरी गाठत तिसरा क्रमांक मिळविला होता. या संघाने तीन वेळा स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठली आहे.

गोव्याचा संभाव्य कबड्डी संघ : देवेंद्र जोशी, नेहाल सावळ देसाई, साहिश गावडे, लक्ष्मण गौडा, आकाश सिंग, भार्गव मांद्रेकर, राहुल नागावत, ध्रुविक गोयत, वेदांग कुडके, आकाश बिबोळकर, हुसेन, सुमीतकुमार पांडे

सहाय्यक प्रशिक्षक : ओमकार गावस, संघ व्यवस्थापक : सुषभ मोरजकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT