Guidance on Infectious diseases Dainik Gomantak
गोवा

वास्‍कोत पावसाळी आजारांबाबत मार्गदर्शन...

उपस्थितांना डेंग्यू, मलेरिया, फालेरिया आदी रोगांसंबंधी पोस्टर्स, पॉवर पॉईंटद्वारे माहिती देण्यात आली.

दैनिक गोमन्तक

वास्को: लायन्स क्लब ऑफ वास्को द गामाने इंडिया कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च पणजी यांच्या सहकार्याने नवेवाडे येथील हाऊसिंग कॉलनीतील रहिवाशांसाठी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांसंबंधी माहिती दिली. तसेच हे आजार होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली. डासांची पैदास होऊ नये याकरीता कोणती खबरदारी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना डेंग्यू, मलेरिया, फालेरिया आदी रोगांसंबंधी पोस्टर्स, पॉवर पॉईंटद्वारे माहिती देण्यात आली. डासांची पैदास कशी होते, डासांची अंडी, अळ्या व इतर अवस्थासंबंधी मार्गदर्शन करण्‍यात आले. डासांची पैदास झालेली भांडी दाखविण्यासाठी ठेवण्यात आली होती, जेणेकरून संबंधित लोकांना त्यामध्ये वळवळणाऱ्या अळ्यांसंबंधी योग्य ती माहिती मिळेल हा उद्देश होता.

डासांचे प्रकार किती आहेत, त्यापैकी कोणते डास चावले तर मलेरिया, डेंग्यू, फालेरिया आदी आजार होतात यासंबंधी डॉ. अजितकुमार मोहंती यांनी माहिती दिली. मच्छरदाणीचा योग्य वापर करा, असे आवाहन करण्यात आले. डासांची पैदास रिकाम्या बाटल्या, कुंड्या, करवंट्या, टाकाऊ टायर यात साचलेल्‍या पाण्‍यामध्‍ये होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांची योग्य ती विल्हेवाट लावा. आपले आरोग्य जपा. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला जबाबदार धरू नका, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By- Election: आम्ही चालवू पुढे 'बाबां'चा वारसा! रितेशनी घेतला रवींच्या कार्यालयाचा ताबा, उमेदवारीबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य

Horoscope: 'या' 3 राशींचे नशीब चमकणार! गुरु-शुक्र केंद्र योग देणार अफाट यश आणि धनलाभ; करिअर आणि व्यवसायातही होणार मोठी प्रगती

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Goa Today's News Live: गोव्याचा 'अभिनव' पुन्हा चमकला, पंजाबविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

SCROLL FOR NEXT