Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

व्हेंझी व्हिएगस यांच्या धिरयो विधेयकाला वाढता पाठिंबा

बैलांच्या झुंजींना (धिरयो) पारंपरिक खेळ या व्याख्येत बसवून त्यांना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी जे खासगी विधेयक मांडले आहे, त्याला फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई तसेच मांद्रेचे आमदार जित आरोलकर यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : बैलांच्या झुंजींना (धिरयो) पारंपरिक खेळ या व्याख्येत बसवून त्यांना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी जे खासगी विधेयक मांडले आहे, त्याला फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई तसेच मांद्रेचे आमदार जित आरोलकर यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

या विधेयकाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करताना जर तामिळनाडूत जलीकुट्टी ही बैलांची शर्यत पारंपारिक खेळ होऊ शकते, तर गोव्यात धिरयो का होऊ शकत नाही असा सवाल विजय सरदेसाई यांनी केला आहे.

तामिळनाडू सरकारने जसे सर्वोच्च न्यायालयाला आपले म्हणणे पटवून दिले, त्याप्रमाणे गोवा सरकारनेही आपली बाजू पटवून द्यायला पाहिजे. त्यासाठी सरकारला इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

आज सरदेसाई याना पाठिंबा देण्यासाठी विधानसभा संकुलात धिरयो आयोजक मोठ्या प्रमाणावर हजर होते. सासष्टी, तिसवाडी व पेडणे या तीन तालुक्यात या झुंजी लोकप्रिय असून सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही त्यांचे बेकायदेशीररित्या आयोजन केले जात आहे. पेडणे तालुक्यात मांद्रे येथे हा प्रकार विशेष लोकप्रिय असून त्यासाठी आरोलकर यांनीही या विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

या झुंजी आयोजित करताना बैलांच्या शिंगांना टोपण लावून त्यांना इजा होण्यापासून वाचवता येणे शक्य आहे, असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT