Trinamool Congress Dainik gomantak
गोवा

गोव्यात तृणमूल काँग्रेसला मोठ यश, 150 तरुण सदस्यांचा पक्षात प्रवेश

गोव्यात तृणमूल काँग्रेसला मोठी चालना मिळत आहे

दैनिक गोमन्तक

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजल आहे. यातच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी राज्यातील नेतृत्व निकराने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी तृणमुलसह इतर राजकीय पक्षांनी मोट बांधली आहे. अशातच आज नेते किरण कांदोळकर, सामील वोल्वोईकर, मारिओ पिंटो, फ्रान्सिस डी टुम, सुरेंद्र वोलवाईकर यांच्या उपस्थितीत 150 तरुण सदस्य गोवा TMC मध्ये कुंबरजुआ येथे सामील झाले आहेत.

दरम्यान, गोव्यात तृणमूल काँग्रेस (TMC) ला मोठी चालना मिळत आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly elections) एका दिवसात 150 प्रमुख नेत्यांनी इतर पक्ष सोडत, गोवा टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, गोवा (goa) तृणमूल काँग्रेसने पोर्वोरिममध्ये पक्षाचे कार्यालय उघडले आहे. उद्घाटन गोवा टीएमसी नेते संदीप वझरकर यांच्यासह शंकर फडते, विल्बर टिक्लो आणि अनेक पंच सदस्यांनी केले. एका प्रेस नोटमध्ये, गोवा टीएमसीने म्हटले आहे की गोवा टीएमसीने गेल्या 3 महिन्यांत उघडलेले हे सहावे पक्ष कार्यालय आहे. इतर पाच कार्यालये पणजी, नुवेम, वास्को, पोरीएम आणि वेलीम येथे आहेत. राजकीय कार्यकर्ते आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बाबतीत पक्षाची झपाट्याने वाढ होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT