RTI Portal: Dainik Gomantak
गोवा

RTI Portal: आरटीआय पोर्टलचे शानदार लोकार्पण

RTI Portal: तीस दिवसांच्या आत मिळणार सरकारी माहिती

दैनिक गोमन्तक

RTI Portal:

माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीने सुरू केलेल्या ‘आरटीआय’ (माहिती अधिकार) पोर्टलचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष आमदार दिलायला लोबो, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, मनोरंजन संस्थेच्या अंकिता मिश्रा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या संकेतस्थळावर आरटीआय अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी https://rti.goa.gov.in. या पोर्टलचा वापर करता येईल.

दरम्यान, माहिती व प्रसिद्धी खात्याने गोवा मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘नवे पर्व’ या त्रैमासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सरकारने केलेली कामे, नव्या प्रकल्पांची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी या मासिकाचा उपयोग होईल.

पोर्टलची खासियत

  • सरकारी खात्याचे सर्व विभाग जोडले आहेत.

  • माहिती मागितल्यास अर्जदाराला ३० दिवसांच्या आत ती दिली जाईल.

  • कोणत्या खात्याची माहिती पाहिजे ती सविस्तर नोंदवावी लागेल.

  • ३० दिवसांच्या आत माहिती मिळाली नाही, तर पुन्हा मागण्याचा अधिकार.

  • त्यातही अर्जदाराचे समाधान झाले नाही, तर माहिती आयुक्तांकडे तक्रारीचा पर्याय.

  • अर्जदाराला सुरुवातीला दहा रुपये ऑनलाईन भरावे लागतील.

  • माहिती ऑनलाईन पद्धतीने पेपर किंवा सीडी, पेनड्राईव्हवर दिली जाईल.

  • त्यासाठी शुल्क आकारले जाईल, त्याविषयीची माहिती अर्जदाराला मोबाईलवर मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

SCROLL FOR NEXT