Gracina Colaco cleared NEET UG Dainik Gomantak
गोवा

अभिमानास्पद ! वास्कोच्या ग्रासीनाचे NEET परीक्षेत उत्तुंग यश, ST उमेदवार अव्वल येण्याची पहिलीच वेळ

गोव्यातील एसटी उमेदवार या परीक्षेत अव्वल येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Gracina Colaco cleared NEET UG: वास्को येथील ग्रासीना कोलाको येथील अनुसूचित जमातीच्या मुलीने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) (UG) परीक्षेत गोव्यात अव्वल स्थान पटकावले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मंगळवारी हा निकाल जाहीर केला. गोव्यातील एसटी उमेदवार या परीक्षेत अव्वल येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

(Gracina Colaco from Vasco cleared NEET UG and Secured first Rank in Goa)

सेंट अँड्र्यूज उच्च माध्यमिक हायस्कूल वास्को मधील ग्रेसिना कोलाको हिने नीट यू.जी परीक्षेत 2022-23 मध्ये अव्वल स्थान पटकावून उत्तुंग यश संपादन केले आहे.

ग्रेसीना हिने या परीक्षेत 680 गुण मिळवले आहेत. ग्रेसीना कोलाको हिने मार्च 2023 च्या गोवा बोर्डाच्या एचएसएससी परीक्षेत विज्ञान शाखेत तिसरा क्रमांक मिळवला आणि गणितात पूर्ण गुण मिळवले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील ग्रेसिनाचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

ग्रॅसिना अष्टपैलू खेळाडू असून, तिने क्रीडा संचालनालयाने आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये संस्थेचे प्रतिनिधित्व केले आहे. ग्रॅसिनाने सह- अभ्यासक्रम आणि अभ्यासेत्तर उप्रकामांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

ग्रॅसिनाला बिट्स पिलानी, सांकवाळ - गोवा येथे आयोजित सेंट अँड्र्यूज एच.एस.एस च्या वार्षिक दिन सोहळ्यात मिस अँड्र्यूज 2023 ही पदवी प्रदान करण्यात आली.

सेंट अँड्र्यूज एचएसएस वास्कोचे व्यवस्थापन, पीटीए, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT