Declared public holiday  Dainik Gomantak
गोवा

Public Holiday: पंचायत मतदानासाठी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्यातील 186 पंचायतीसाठी येत्या 10 ऑगस्टला मतदान होत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात 186 पंचायत निवडणूकीसाठी (Goa Panchayat Election) येत्या 10 ऑगस्टला मतदान होत आहे. मतदानासाठी (Polling) राज्य सरकारने 10 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्य सरकारच्या प्रशासन नियोजन विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी द्यावी. गोवा पंचायत राज कायदा 1994 नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यात 186 पंचायत निवडणूकीसाठी सोमवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी दोन्ही जिल्ह्यातून 1,499 उमेदवारी अर्ज दाखल झाले. निवडणूकीसाठी एकूण 6,256 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दाखल अर्जांचे मंगळवारी (दि.26) रोजी छाननी केली जाणार असून, बुधवारी 27 जुलै अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 10 ऑगस्ट रोजी राज्यातील 186 पंचायतीसाठी मतदान (polling) होईल आणि 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी (Vote Counting) होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT