Goa RajBhavan Nai Pahal Scheme Books Publications  Dainik Gomantak
गोवा

Goa Raj Bhavan : साहित्यिकांच्या मदतीसाठी राजभवन तत्पर : राज्यपाल पिल्लई

‘नई पेहेल’ योजना राबविणारे एकमेव राजभवन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Raj Bhavan: साहित्यिकांना मिळालेल्या पुरस्काराचा सोहळा झाला पाहिजे, त्याचा आनंद साजरा केला पाहिजे. तसेच साहित्यिकांना समाजानेदेखील साहाय्य करणे गरजेचे आहे. ‘नई पेहेल’ योजनेअंतर्गत देशातील 22 घटनामान्य भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित करण्यास मदत करणार असल्याचे सांगत राजभवन साहित्यिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असेल, असे प्रतिपादन राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.

ते राजभवन येथील जुन्या दरबार हॉल येथे ‘नई पेहेल’ योजनेअंतर्गत पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठकार दामोदर मावजो, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, महेंद्र आल्वारीस व इतर उपस्थित होते.

दरम्यान, राजभवन विशेष अधिकारी मीर वर्धन म्हणाले की, ही योजना लेखकांच्या साहाय्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी फायद्याची ठरेल.

यावेळी संजय सालेलकर लिखित कोकणी पुस्तक ‘सूत्रसंचालन कला आणि शास्त्र’, पल्लवी पालेकर लिखित ‘स्वप्नवेध’ हा मराठी कवितासंग्रह, ॲड. मनोहर आडपईकर लिखित ‘मी असा कसा’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक तसेच पाचू मेनन यांच्या दोन इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नवलेखकांना मिळेल प्रेरणा

जोपर्यंत एखादा लेखक आपले साहित्य प्रकाशित करत नाही, तोपर्यंत साहित्यक्षेत्रात त्याचे नाव होत नाही. गोव्याचे राज्यपाल स्वतः साहित्यिक असल्याने वाचन, लेखन, अक्षर, साहित्य यांची त्यांना जाण आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून आपले साहित्य सर्वांपर्यंत पोहोचविण्यास संधी मिळेल तसेच इतर नवलेखकांना प्रेरणा मिळेल, असे ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT