Governor P S Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

Goa Raj Bhavan: गोव्यात राजभवनातर्फे सोमवारी होणार 5 पुस्तकांचे प्रकाशन

नई पहल योजना : कोकणी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके

Akshay Nirmale

Goa Raj Bhavan: गोव्यात राजभवनतर्फे 29 मे रोजी 'नई पहल' योजनेअंतर्गत 5 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली.

राजभवनच्या पुस्तक प्रायोजक योजनेंतर्गत ही पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. ही पुस्तके कोकणी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील आहेत.

या कार्यक्रमाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गोव्यातील लेखक दामोदर मावजो यांची उपस्थिती असणार आहे.

संजय रमेश सालेलकर (कोंकणी), पल्लवी पोळेकर (मराठी), अॅड. मनोहर आडपाईकर (मराठी) या लेखकांनी ही पुस्तके लिहिली आहेत. तर पाचू मेनन यांची इंग्रजीतील दोन पुस्तके आहेत.

पिल्लई म्हणाले की, राजभवनने फेब्रुवारीमध्ये नवीन लेखकांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना जाहीर केली होती, ज्या अंतर्गत राजभवन नवलेखकांची पुस्तके प्रकाशित करणार होते. कोंकणी, मराठी, हिंदी आणि संस्कृतमध्ये लिहिणाऱ्यांसाठी ही योजना होती.

या पुसत्कांच्या प्रकाशनाचा खर्च राजभवन प्रायोजित करत आहे. नंतर इंग्रजीचाही या योजनेत समावेश करण्यात आला.

या योजनेत पुस्तकांचे विषय काल्पनिक, नॉन फिक्शन, कविता, आत्मचरित्र किंवा कथांचे संकलन असू शकते.

पुस्तकाच्या विक्री प्रक्रियेत राजभवनचा सहभाग असू शकत नाही, परंतु नवीन लेखकांना पुढे येण्यास आणि त्यांची साहित्यातील सर्जनशील प्रतिभा सिद्ध करण्यास मदत होईल, असेही राज्यपाल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT