MLA Chandrakant Shetye  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining News: ‘लीज’मधून मुळगावला बाहेर काढण्याचे सरकारचे प्रयत्न; आमदार डॉ. शेट्येंची माहिती

मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

दैनिक गोमन्तक

शिरगावप्रमाणेच खाण ‘लीज’ मुद्यावरून मुळगाव गावातही असंतोष पसरला आहे. मुळगावातील मंदिरांसह घरेदारे खाण परिक्षेत्रातून बाहेर काढल्याशिवाय खाण व्यवसाय सुरू करण्यास देणार नाही. असा ठाम पवित्रा मुळगाववासीयांनी घेतला आहे.

अलीकडेच झालेल्या खाणविरोधी जाहीर सभेतही हा मुद्दा तापला होता. दुसऱ्या बाजूने मंदिरांसह घरेदारे खाण परिक्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तशी सकारात्मक ग्वाही दिली आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणी केल्याचे त्यांनी सांगितले.

जोपर्यंत खाण परिक्षेत्रातून गावाला बाहेर काढण्यात येत नाही. तोपर्यंत स्थानिक पंचायतीने खाण कंपनीला कोणताच ''ना हरकत दाखला'' देऊ नये. अशी मागणीही मुळगाववासीयांनी केली आहे.

१६४ हेक्टर जमीन ‘लीज’ क्षेत्रात

डिचोली खाण ब्लॉकअंतर्गत मुळगावमधील १६४ हेक्टर जमीन खाण लीज क्षेत्रात दाखविण्यात आली आहे. मुळगावची ग्रामदेवी श्री केळबाई देवीच्या मंदिरासह लहानमोठी धार्मिक स्थळे, गावकरवाडा आणि मानसबाग येथील मिळून २३२ घरे, शाळा, पंचायतघर यासह नैसर्गिक जलस्रोत असलेले तलाव खाण परिक्षेत्रात येत आहेत.

आधीच खाणबंदीपूर्वी खाण व्यवसायामुळे मुळगावचे अस्तित्व संकटात आले होते. नवीन लीजप्रमाणे खाण व्यवसाय सुरू झाल्यास भविष्यात गाव उद्ध्वस्त होऊन गावचे अस्तित्वच नामशेष होईल, अशी भीती मुळगाववासीयांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT