Government will build Education hub in Macazana says goa chief minister Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

माकाझन येथे उभारणार शैक्षणिक हब : मुख्यमंत्री सावंत

माकाझन येथील कुष्ठरोग इस्पितळ जागेत शैक्षणिक हब उभारण्‍यात येईल, असे आश्‍‍वासन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिले.

दैनिक गोमन्तक

गेली अनेक वर्षे भिजत पडलेला सोनसोडोचा प्रश्‍‍न आता लवकरच सोडविण्यात येईल. तसेच माकाझन येथील कुष्ठरोग इस्पितळ जागेत शैक्षणिक हब (Education Hub) उभारण्‍यात येईल, असे आश्‍‍वासन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिले. सोनसोडोच्या दैनावस्थेस कुडतरी तसेच फातोर्ड्याचे आमदार जबाबदार असल्याचा आरोपही त्‍यांनी केला आहे. (Government will build Education hub in Macazana says goa chief minister Pramod Sawant)

कुडतरीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांनी काल शुक्रवारी सकाळी काँग्रेस पक्षाचा त्याग केला व सायंकाळी भाजपमध्‍ये प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्‍हणाले की, सोनसोडोप्रश्‍‍नी दोन्‍ही आमदारांनी फक्त निवेदनेच केली. येथील कब्रस्तानला अडथळा आणण्यासही तेच कारणीभूत आहेत. आपण यापूर्वी कुडतरी प्राथमिक केंद्राचा दर्जा उंचावण्याचे वचन दिले होते व ती प्रक्रिया सुरू झालेली आहे, शैक्षणिक हबबाबतही पावले उचलली गेली आहेत. आपले सरकार हे काम करणारे आहे व विविध ठिकाणी सुरू असलेली कामे ही त्याचीच उदाहरणे आहेत असेही मुख्‍यमंत्र्यांनी नमूद केले.

भाजप गेली दहा वर्षे सत्तेत आहे. या काळात कधीच गोव्यातील जनतेत जात-धर्माच्या नावावर सरकारने भेदभाव केलेला नाही असे सांगून येत्या निवडणुकीत कुडतरीतील लोकांनी भाजप उमेदवाराला निवडून द्यावे व विकासाची दारे खुली करावीत, असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी केले. ‘भाजप नको’ असे लोकांना सांगून येथून आजवर अनेक आमदार व खासदार झाले, पण ते विकास करू शकले नाहीत. मात्र यावेळी ते चित्र बदला व विकासाला प्राधान्‍य द्या, असेही ते म्‍हणाले.

यावेळी भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, आमदार क्लाफास डायस आणि मान्‍यवरांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT