Goa Police Dainik Gomantak
गोवा

गोव्यात वाहन चालवताय तर सावधान! नियम मोडल्यास मोठ्या दंडाची तरतूद

ट्रिपल सीट आणि विनाहेल्मेट दुचाकीवरुन फिरल्यास 1000 रुपये दंड आणि परवाना रद्द

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात नवीन मोटर वाहन कायदा अमलात आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता बेशिस्त वाहनचालकांना याचा चांगलाच दणका बसणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून नवीन कायदा अमलात आणला जाणार आहे. नवीन कायद्यानुसार केवळ दंडच नाही तर वाहन चालवण्याचा परवानाही रद्द केला जाणार आहे.

गोव्यात येत्या 1 एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायदा अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. तसं परिपत्रकच प्रादेशिक परिवहन (RTO) खात्याने जारी केलं आहे. नेहमीच्या दंडापेक्षा दहापट दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. विनाहेल्मेट गाडी चालवल्यास तसंच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास केल्यास 1000 रुपयांचा दंड आणि परवाना रद्द करण्यात येणार आहे. गोवा सरकारकडून या संबंधी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

गोवा सरकारने (Goa Government) मोटर वाहन कायदा 1998 मधील तरतुदींमध्ये जुलै 2021 मध्ये बदल करण्यात आले होते. आता या नव्या तरतुदींची अमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून गोव्यात केली जाणार आहे. नवी दंडाची रक्कम ही सध्याच्या रकमेपेक्षा दहापटींनी जास्त असेल. यात वैध परवान्याशिवाय गाडी चालवल्यास किंवा परवाना नसलेली गाडी चालवल्यास तब्बल 10000 रुपयांचा दंड (Penalty) आकारला जाणार आहे. रजिस्ट्रेशन न झालेली किंवा विमा नसलेली गाडी चालवल्यास 2000 रुपयांचा दंड आकारला जाईल. तर वेगाने गाडी चालवणे, सीट बेल्ट न वापरणे, गाडी चालवताना इतरांचा जीव धोक्यात घालणे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्याला 1000 रुपयांचा देड केला जाणार आहे. तसंच ट्रिपल सीट आणि विनाहेल्मेट दुचाकीवरुन फिरल्यास 1000 रुपये दंड आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT