Tourism Development Dainik Gomantak
गोवा

Tourism Development : सरकारने पर्यटन विकासावर लक्ष द्यावे : मायकल लोबो

Michael Lobo : मायकल लोबो यांनी पर्यटन, छपाई व लेखा सामग्री तसेच माहिती तंत्रज्ञान खात्याच्या मागण्यांना पाठिंबा देताना चर्चेवेळी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर पर्यटन हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. त्यामुळे सरकारने या पर्यटन क्षेत्रावर अधिक लक्ष व भर देण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या टॅक्सी व्यवसायावरील वादावर तोडगा काढायला हवा.

पर्यटन विधेयक मंजूर करण्यापूर्वी पर्यटन क्षेत्रातील विविध घटक तसेच किनारपट्टी लाभलेल्या मतदारसंघातील आमदारांना विश्‍वासात घेऊन यावर चर्चा करावी, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी पर्यटन, छपाई व लेखा सामग्री तसेच माहिती तंत्रज्ञान खात्याच्या मागण्यांना पाठिंबा देताना चर्चेवेळी केली.

राज्यात गावाअंतर्गत पर्यटन, वैद्यकीय पर्यटन तसेच क्रुझ पर्यटनाला चांगली संधी आहे. क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी मंत्र्यांनी आमदारांबरोबर एकत्रित बसून त्यावर पर्याय काढायला हवा. जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळ्याला सहा महिने बाकी आहेत. मात्र, अजूनही देश-विदेशातील पर्यटकांना या सोहळ्यासंदर्भात माहिती देण्याबरोबरच युरोप, फ्रान्स व दुबई यासारख्या देशांमध्ये त्याचे प्रमोशन कसे करता येईल यावर सरकार पातळीवर अजून काहीच रूपरेषा ठरविली गेलेली नाही.

सरकारने किनारपट्टी पर्यटनासंदर्भातची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली होती व त्यावर करण्यात आलेला ५ कोटींचा खर्च वाया गेला आहे. अनेक किनारपट्ट्यांवरील स्वच्छता समाधानकारक नाही. दृष्टी कंपनीचे जीवरक्षक चांगली सेवा देत आहेत.

मात्र, त्यामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी खात्याने किनारपट्टी परिसरातील आमदारांबरोबर बैठक घ्यायला हवी. जीवरक्षकांना देण्यात आलेल्या साधनसुविधांचा अभाव आहे. किनारपट्टीवर पर्यटकांवर देखरेख ठेवण्यासाठी आणखी एक स्कूटर व जीपची आवश्‍यकता आहे, असे लोबो म्हणाले.

आग्वाद कारागृहाचे गोवा मुक्तिलढ्यातील आठवणींची माहिती देणाऱ्या वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. या संग्रहालयातील माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ते शिक्षण संस्थांना मोफत ठेवण्यात आले आहे. मात्र, पर्यटन खात्याकडून त्याची माहिती संस्थांपर्यंत पोहोचली नसल्याने या ठिकाणी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना घेऊन भेट देत नाहीत. त्यासाठी खात्याने या संस्थांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना गोव्याच्या मुक्तिलढ्याचा इतिहासाची माहिती देण्यासाठी या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्याची सूचना करावी.

- मायकल लोबो, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT