Government Policy 2023  Dainik Gomantak
गोवा

Government Policy : सरकारच्या योजनांचा लाभ घ्या : गटविकास अधिकारी सुर्याजीराव राणे

Government Policy : म्हाऊसी पंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेवेळी ते बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Government Policy : वाळपई, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक गरजूंना व्हावा यासाठी ही यात्रा राबविण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन सत्तरी गटविकास अधिकारी सुर्याजीराव राणे यांनी केले.

म्हाऊसी पंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेवेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच सोमनाथ काळे, दाबे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रोशन पैंगीणकर, कृषी खात्याचे अधिकारी प्रभू, स्वयंपूर्ण मित्र श्याम सावंत, पंच सयाजी सावंत, गुरुदास गावस, प्रीती गावकर, सुलभा देसाई, दत्ता गावस आदींची उपस्थिती होती.

सरपंच सोमनाथ काळे म्हणाले, सरकारची ही संकल्पना लाभदायक असून प्रत्येकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे. यावेळी मुख्याध्यापिका रोशन पैंगीणकर यांनी विद्यालयात पातळीवर मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी ज्येष्ठ नागरिक महिला सीता गावस, आबोले गावकर, शेवंती सावर्डेकर यांचा खास भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अंगणवाडीतील मुलांचा सन्मान करण्यात आला. तसेच सरकारतर्फे म्हाऊसी पंचायतीला प्रशस्तीपत्र देण्यात आले.

यावेळी उपस्थित नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला. स्वागत सरपंच सोमनाथ काळे यांनी केले. सूत्रसंचालन सचिव संदीप हल्याळी यांनी केले. आभार पंच गुरुदास गावस यांनी मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT