Goa Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: आता सरकारी नोकरीसाठी वशिल्याची गरज नाही!

Goa Government Job: मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला पुन्हा केले आश्‍वस्त

दैनिक गोमन्तक

Goa Government Job: सरकारी नोकरी वशिल्याशिवाय मिळणारच नाही, अशी मनाची समजूत करून घेतलेल्या तरुणाईशी संवाद साधत ‘यापुढे सरकारी नोकरीसाठी वशिल्याची गरज भासणार नाही’ अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आश्वस्त केले.

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त आसगाव येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात आयोजित मुलाखतीदरम्यान गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या स्थापनेचा हेतू त्यांनी स्पष्ट केला. मात्र, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आधी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणेही आवश्यक आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकारी खात्यात, खासगी क्षेत्रात पाठ्यवेतनावर उमेदवार नेमले जात आहेत. ज्यांना सरकारी सेवेत येण्याची इच्छा आहे, त्यांनी हे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे. कारण आता कोणत्याही पदासाठी किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. सध्या खासगी क्षेत्रात काम कऱणाऱ्यांचाही अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. कामाची संस्कृती रुजवण्यासाठी केवळ गुणवत्तेवर आधारीत कर्मचारी भरती केली जाणार आहे.

गुणवत्तेनुसार मिळणार नोकरी

वशिल्याने नोकरी देण्याचा प्रकार बंद केला आहे. नोकर भरतीच्या स्पर्धेतून पुढे येणाऱ्यालाच भविष्यात गुणवत्तेवर आधारीत सरकारी नोकरी दिली जाईल. भरतीसाठी लागणारी प्रक्रिया पदवी किंवा इतर तत्सम अभ्यासक्रमात प्रवेश करताना सुरू करावी. त्यासाठी सर्व कॉलेजना सामान्य ज्ञान तसेच संबंधित विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची सूचना केली जाणार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

होतकरूंना हजेरीत सवलत

खासगी क्षेत्रात नोकरीसाठी भरती प्रक्रिया केली जाते. त्यासाठी सरकारने विविध कंपन्यांसोबत करार केला आहे. नोकर भरती मेळावे आयोजित केले जातात. एखाद्याची निवड नोकर भरती मेळाव्यात झाल्यास भविष्यात त्याला पुढे जाण्याच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. शिक्षण घेत नोकरी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्याला हजेरीत सवलत देण्याचा विचार केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT