School Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील शाळांसाठी सरकारकडून कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

शाळांना (School) आफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे वर्ग चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातील (Goa) आठवी इयत्तेपर्यंतच्या शाळा (School) सुरू करण्याबाबत सावधगिरी बाळगताना सरकारने तूर्त 7 वी व 8 वीचे वर्ग प्रत्यक्षात ऑफलाईन पध्दतीने गुरुवारपासून सुरु होत असून यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे (Corona Guidelines) सरकारकडून जारी करण्यात आली आहे. (Offline) यासंदर्भातचे परिपत्रक सरकारने काढले आहे.

यातील काही प्रमुख मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे

  • नजीकच्या शाळांनी आप आपल्या वेळांमध्ये बदल करुन घ्यावे.

  • शाळेतील वर्ग एक दिवसाआड चालविण्यात यावेत.

  • शाळांना आफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे वर्ग चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • शाळांच्या प्रवेशद्वारांवर मुलांचे आणि शिक्षकांचे तापमान चेक करावे, तसचे सॅनिटाईझ करुन विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये पाठवावे.

  • शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ घेण्याची परवानगी नाही.

  • शाळांमध्ये कोरोनाची नियमांची अमंलबजावणी करण्यात यावी.

दरम्यान, समितीने केलेल्या शिफारशीबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सहमती न दाखवता शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय विविध क्षेत्रातील घटकांशी चर्चा तसेच सूचना मागवून घेणार असल्याने 22 नोव्हेंबरला शाळा सुरू होणार नाहीत. त्यासंदर्भातचा निर्णय 20 नोव्हेंबरला घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. गेल्या शनिवारी 20 नोव्हेंबरला इफ्फी उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री व्यस्त राहिल्याने त्यासंदर्भातचा निर्णय सरकारला घेणे शक्य झाले नाही.

Corona Guidelines
Corona Guidelines

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Safety: खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करा! उगवेतील नागरिकांची मागणी, उदय महाले यांच्याकडून निवेदन सादर

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

Student Mental Health: 'तू हरलास तरी मी पाठीशी आहे' म्हणणारं कुणी उरलंय का? शिक्षणाच्या बाजारात हरवलेली माणुसकी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण?

Shakib Al Hasan: क्रिकेटविश्वात खळबळ! 'त्या' हत्येच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी 1 कोटींची मागणी, शाकिब अल हसनचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT