Goa Tourism |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'सनबर्न'मुळे खरोखर पर्यटक वाढतात का? सरकारच्या पर्यटनवृद्धीच्या धोरणाबाबत अनेक प्रश्न

Goa Tourism Revenue: पर्यटकांना चांगल्या पायाभूत सुविधा नाहीत आणि आता उड्डाणांचे दर वाढल्याने पर्यटक ५० ते ६० टक्क्यांनी घटले आहे, असे गोवा शॅकमालक संघटनेचे उपाध्यक्ष सेबी डिसोझा यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

is Goa losing the tourism ?

पणजी: सरकार पर्यटनामार्फत महसूल वाढविण्यावर भर न देता कराच्या माध्यमातून महसूल प्राप्त करण्यावर भर देत आहे. पर्यटकांना चांगल्या पायाभूत सुविधा नाहीत आणि आता उड्डाणांचे दर वाढल्याने पर्यटक ५० ते ६० टक्क्यांनी घटले आहे, असे गोवा शॅकमालक संघटनेचे उपाध्यक्ष सेबी डिसोझा यांनी सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेत पर्यटकांची संख्या ५० टक्क्यांनी घटल्याचा दावा गोवा शॅकमालक संघटनेने आणि टीटीएजीतर्फे केला आहे.

राज्य सरकारकडून पर्यटनवृद्धीसाठी योग्यरीत्या आणि हवे तिथे प्रोमोशन होत नाही हे आम्ही स्वतः पाहिले आहे. इंग्लड येथे गेलो असता तिथे गोव्यासंदर्भात प्रोमोशन झालेले आम्ही पाहिले नाही. तसेच विदेशात सरकार प्रोमोशन करण्यासाठी जातात, पण त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत नसल्याने ते प्रमोशन चुकीच्या दिशेने चालू आहे का असा प्रश्न निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले.

गोव्यातील पर्यटन क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी स्थानिक पातळीवर आणि सरकारच्या पातळीवर प्रयत्नांची आवश्यकता आहे. पारंपरिक पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करणे, शॅक आणि इतर स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देणे, तसेच विविध हंगामात इव्हेंट्स आयोजित करणे गरजेचे आहे, असे गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी सांगितले.

सनबर्न महोत्सवाचा प्रभाव नाही

गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘सनबर्न’ महोत्सवामुळे पर्यटकांची संख्या वाढते असे काहीजण मानतात. मात्र, क्रुझ कार्दोज यांनी हे विधान फेटाळले आहे. त्यांच्या मते, जेव्हा अनेक पर्यटक आधीच गोव्यात येऊन पोहोचलेले असतात तेव्हाच सनबर्न मुख्यतः नवीन वर्षाच्या कालावधीत होतो. सनबर्नमुळे खरोखरच पर्यटक वाढतात का हे तपासण्यासाठी हा महोत्सव एप्रिल किंवा मे महिन्यात आयोजित करण्याची गरज आहे, असे क्रुझ कार्दोज म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT