Ganesh Gaonkar Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: 'दूधसागर'विषयी बेताल विधाने नकोत! आमदार गणेश गावकर

Ganesh Gaonkar: खासदार फर्नांडिस अपुऱ्या माहितीच्या आधारावर लोकांची दिशाभूल करत असून लोकांनी त्याला बळी पडू नये असे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: दूधसागर धबधबा परिसरासह सावर्डे मतदारसंघाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून येथील लोकांच्या रोजगाराची जाणीव सरकारला असल्याने त्यांच्या हिताचेच निर्णय सरकार घेत आहे. मात्र, काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस यांच्याकडून अपुऱ्या माहितीच्या आधारावर येथील लोकांची दिशाभूल केली जात असून लोकांनी त्याला बळी पडू नये, असे आवाहन सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी केले.

फोंड्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार गणेश गावकर बोलत होते. यावेळी कुळेचे सरपंच गोविंद शिगावकर तसेच इतर उपस्थित होते. खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना गणेश गावकर यांनी सरकारकडून सावर्डे मतदारसंघाच्या हितासाठी पर्यावरण राखून घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.

गणेश गावकर म्हणाले की, स्वतःच्या जागेतील व्यावसायिक आस्थापनाची संकेतस्थळावरून कुणीही जाहिरात करू शकतो. मात्र, दूधसागर धबधबा परिसर हा वन प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने तेथे हा प्रकार चालत नाही. त्यामुळे पर्यावरण राखून आणि कायदे आणि नियम यांच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावे लागतात. बर्ड वॉचिंग, व्हाईट वॉटर राफ्टिंग तसेच इतर अनेक उपक्रम घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्णवेळ पर्यटन रोजगार देण्याचे प्रयत्न

दूधसागर तसेच इतर परिसरात पर्यटनाच्यादृष्टीने कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि हितासाठी अनेक निर्णय घेतले असून पर्यटनात वृद्धी व्हावी यासाठी सरकार कार्यरत आहे. त्यामुळे कुणीही चुकीची विधाने करून येथील टूर ऑपरेटर तसेच तत्सम घटकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये याकडे लक्ष ठेवावे, असे गणेश गावकर म्हणाले. शेवटी पूर्णवेळ पर्यटन रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून भाजप सरकार त्यासाठी सक्षम असल्याचे गणेश गावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT