Margao Government College Of Commerce and Economics
Margao Government College Of Commerce and Economics Dainik Gomantak
गोवा

Margao News : बड्डे महाविद्यालय ‘स्वायत्त’; शिरपेचात मानाचा तुरा

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, २०१० साली स्थापन झालेल्या शासकीय वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय,बड्डे ने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड दिली. शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता शिक्षणातून समाजहित साधणारे कर्तबगार विद्यार्थी घडविले.

गेली १४ वर्षे अविरतपणे करत असलेल्या या कार्याची दखल घेत काल दिल्लीस्थित विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)ने बड्डे सरकारी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा बहाल केला,अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी दिली.

युजीसी दिल्लीकडून बड्डे सरकारी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची रचना करता यणेार आहे. याशिवाय अभ्यासक्रम निश्चित करणारे स्वतंत्र अभ्यासमंडळ, संशोधनासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच आधुनिक शिक्षण पद्वतीचा अवलंब करता येणार आहे, असेही सावईकर म्हणाले.

याबाबत राज्य सरकारचे निरंतर पाठबळ, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांचे मार्गदर्शन, आणि उच्च शिक्षण संचालनालयाचे अथक प्रयत्न यामुळे महाविद्यालयाला हे यश प्राप्त झाले असून प्राचार्य डॉ.एफ.एम नदाफ यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी यांचा वाटाही मोलाचा आहे, असे सावईकर म्हणाले.

महाविद्यालयाने नवकल्पनांना प्राधान्य देऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. सासष्टी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आकांक्षांची पूर्तता करून बोर्डा महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात नवी क्रांती केलेली आहे.

- डॉ.एफ.एम नदाफ, प्राचार्य, बड्डे सरकारी महाविद्यालय.

राज्यातील पहिले सरकारी महाविद्यालय

राज्यात केवळ दोनच महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा मिळाला आहे. त्यामध्ये स्वायत्त दर्जा मिळालेले राज्यातील पहिले सरकारी महाविद्यालय म्हणून बड्डे सरकारी महाविद्यालयाचा उल्लेख करता येईल, असे भूषण सावईकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

Goa News : ‘आमुरचंवर’ लेखसंग्रह ठरेल भावी पिढीसाठी मार्गदर्शक: मिनाक्षी मार्टिन्स

Chhattisgarh: मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, पिकअपखाली चिरडून 15 मजुरांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

Goa Today's Live News: आप बाणावलीची जिल्हा पंचायत निवडणूक लढणार - व्हेंझी

Viral Video: पट्ट्यानं अशी सर्जरी केली, तुम्हीही व्हिडिओ पाहून डोक्यावर माराल हात; म्हणाल, ‘’असला सनकी कधीच पाहिला नाही’’

SCROLL FOR NEXT