Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

Luizinho Faleiro: गोव्यात नद्यांचे गंभीर प्रदूषणाबाबत सरकार निष्काळजी

Luizinho Faleiro: गोव्यामध्ये नद्यांच्या प्रदूषणाची टक्केवारी गंभीर पातळीवर गेली आहे.

दैनिक गोमन्तक

Luizinho Faleiro: गोव्यामध्ये नद्यांच्या प्रदूषणाची टक्केवारी गंभीर पातळीवर गेली आहे. यामुळे पर्यावरण खात्याच्या विशेष सचिवांच्या नेतृत्वाखाली कृती समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती खासदार लुइझिन फालेरो यांच्या प्रश्‍नावर पर्यावरण राज्यमंत्री अश्‍विनीकुमार चौबे यांनी दिली.

2018 मध्ये गोव्यात नदीपात्राच्या 11 क्षेत्रांत प्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे. त्यात साळ नदीच्या प्रदूषणाची पातळी गंभीर (वर्गवारी ३ प्रदूषणाचे प्रमाण 10-20 एमजी/1) बनली आहे, अशी माहिती देत पर्यावरण मंत्री म्हणाले, सदर नद्यांचे पुनर्जीवित करण्यासाठी पर्यावरण खात्याच्या विशेष सचिवांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या कृती कार्यक्रमात प्रदूषणाचे मूळ स्रोत शोधून (नगरपालिकेचे सांडपाणी व्यवस्थापन, औद्योगिक प्रदूषण नियंत्रण व मलनिस्सारण कृती कार्यक्रम) त्यावर प्रक्रिया करण्याची योजना आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच भूगर्भातील पाणी प्रदुषित होऊ नये, यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत.

या भागामध्ये जैववैविध्याला वाहिलेली उद्याने, अतिक्रमण हटविणे, पावसाचे पाणी जतन करणे व नद्यांच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण हाती घेणे आदी उपाययोजना निश्‍चित केल्या आहेत. खासदार लुईझिन फालेरो यांच्या मते, साळ नदीच्या काठी शिरवडे येथे मलनिस्सारण प्रकल्प कार्यरत आहेत.

तेथे दहा वर्षांपूर्वी नवीन प्रकल्प सुरू करण्याचे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. त्यामुळे काही प्रमाणात साळ नदीचे प्रदुषण घटले असले तरी अद्याप बरेच काम बाकी आहे. दै. ‘गोमन्तक’शी संवाद साधताना ते म्हणाले, ‘औद्योगिक प्रदुषणाकडे आपण दुर्लक्ष करीत आलो आहोत. गोव्यातील नद्यांच्या प्रदुषणाची पातळी धोकादायक स्थितीवर जाणे, ही गंभीर बाब आहे आणि राज्य सरकारने त्यावर कडक उपाय योजले पाहिजेत.’

लुईझिन फालेरो, खासदार-

केंद्रानेही आता गोव्यातील नद्यांचे प्रदूषण गंभीर पातळीवर गेल्याचे मान्य केल्याने राज्य सरकारला ही खरोखरच शरमेची बाब आहे. गोव्याचे रक्षण करण्यासाठी नद्यांमधील प्रदूषण तत्काळ हटविले गेले पाहिजे. सरकारने त्याकडे अग्रक्रमाने पाहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT