Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सरकार 'हाऊजी'वर बंदी घालून कॅसिनोंना प्राधान्य देतंय, खासदार फर्नांडिस यांची टिका

Housie Ban Goa; एका बाजूने सरकार ‘हाऊजी’वर बंदी घालत आहे व दुसऱ्या बाजूने कॅसिनोंना मान्यता देत आहे. हाऊजी हा गोव्यातील पारंपरिक खेळ आहे, असं खासदार विरियातो फर्नांडिस म्हणालेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: केंद्र व राज्यातील सरकार सध्या महत्वाची विधेयके बाजूला सारुन ‘वक्फ’ सारखे विधेयक मंजूर करुन देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून ‘एसटी’च्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित ठेवला आहे. तसेच घटनेतील ७३व्या दुरुस्तीची अंमलबजावणी करण्यास हे सरकार धजत नाही.

सरकारने या दुरुस्तीची अंमलबजावणी करून पंचायतींचे हात बळकट करावे, अशी हाक खासदार कॅ.विरियातो फर्नांडिस यांनी दिली.

घटनेतील ७३वी व ७४वी दुरुस्ती करुन माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांनी तळागाळातील लोकांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला होता. या दुरुस्त्यांमुळे पंचायतींना जास्त अधिकार लाभले असते.

त्यांना आरोग्य, रस्ते, शाळा, कृषी सारख्या क्षेत्रांमध्ये स्वतः निर्णय घेऊन विकास करता आला असता. प्रत्येक कामाला राज्य सरकारावर विसंबून रहावे लागले नसते, असेही फर्नांडिस यांनी सांगितले. संसदेची दोन अधिवेशने झाली तरी एसटीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चर्चेस घेतला गेला नाही,असेही ते म्हणाले.

हाऊजींवर बंदी का?

एका बाजूने सरकार ‘हाऊजी’वर बंदी घालत आहे व दुसऱ्या बाजूने कॅसिनोंना मान्यता देत आहे. हाऊजी हा गोव्यातील पारंपरिक खेळ आहे. पूर्वी जत्रा, फेस्तात किंवा फुटबॉल सामन्याच्या मध्यंतराला हाऊजी सुरू असायच्या.

त्यामुळे कोणाचेही नुकसान होत नसे. कुटुंबे एकत्र बसून हाऊजी खेळायचे. मग या हाऊजीवर बंदी का, असा प्रश्न खासदार विरियातो फर्नांडिस यांनी उपस्थित केला. त्यानी सांगितले की कॅसिनोमुळे लोक बरबाद झाले आहेत. मात्र कॅसिनोंना प्राधान्य दिले जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT