Chitra Wagh in goa  Dainik Gomantak
गोवा

गोवेकर गोड, भोळे आहेत पण वेडे नाहीत; चित्रा वाघ

या निवडणुकीत मडगावकर फसणार नाहीत; चित्रा वाघ

दैनिक गोमन्तक

सासष्टी : गोवेकर गोड, भोळे आहेत, पण वेडे नाहीत. त्यामुळे ते विरोधी पक्षांच्या भूल थापांना बळी पडणार नाहीत. तसेच मडगावकर सुद्धा कॉंग्रेस उमेदवाराच्या जाळ्यात आणखीन एकदा फसणार नाहीत, तर बाबू आजगावकरांना निवडून देऊन मडगावच्या सर्वांगीण विकासाची वाट मोकळी करुन देतील असे महाराष्ट्राच्या भाजप नेत्या व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चित्रा वाघ यानी भाजपच्या (BJP) कोंब परिसरात आयोजित केलेल्या सभेत बोलत होत्या.

राहुल गांधी (Rahul Gandhi) येथे येऊन प्रत्येक घराला सहा हजार रुपये देण्याची, पेट्रेल डिझलच्या किंमती 80 पेक्षा जास्त होणार नाहीत असे सांगतात. मग कॉंग्रेसचे (Congress) सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. तेथे त्या सरकारची लोकांना सहा रुपये सुद्धा देण्याची कुवत नाही व पेट्रोल, डिझेलच्या किंमती गोव्यातील किंमती पेक्षा जास्तच आहेत असेही त्यानी सांगितले.

मूठ बंद करुन आत चॉकलेट आहे असे सांगुन लहान मुलांना एकदा फसवता येते . मडगावात तर आमदार गेली 27 वर्षे आपली मूठ उघडत सुद्धा नाही म्हणूनच येथील विकास खुंटला आहे. आता तरी मडगावकरांनी फसू नये व त्याच्या मुठीत काहीच नाही याचे भान ठेवावे व मतदान करावे असे आवाहन त्यानी केले.

मनोहर उर्फ बाबू आजगावकर यानी सांगितले की कोंब हे मडगावचे हृदय आहे. मात्र येथे कुठलाही विकास झालेला नाही. तेव्हा लोकांनी आता तरी शहाणे होऊन आपल्याला मते द्यावी वआपल्यावर विश्र्वास ठेवावा. आपण मतदारांनी दाखवलेल्या विश्र्वासाचा कधीच विश्र्वासघात होऊ देणार नाही असे सांगितले.

कोंब परिसरातील रस्त्याचे हॉटमिक्सिंग करण, मलनिस्सारण पाईपलाईनची दुरुस्तीला आमदाराने सदैव विरोध केला असे सांगून त्यामागची पार्श्र्वभुमी शर्मद रायतुरकर यांनी सांगितली. या प्रसंगी चंदन नायक, रंजिता पै यांची भाषणे झाली. सपभेला मडगाव (Margao) मंडळाचे अध्यक्ष रुपेश हात्मे, सचिव केतन कुरतरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT