Goundalim Goa Car Bike Accident Dainik Gomantak
गोवा

गवंडाळी अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी तर फातोर्डात एकाची आत्महत्या

Pramod Yadav

Goundalim Goa Car Bike Accident: गवंडाळी येथे चारचाकी आणि दुचाकी वाहनात झालेल्या अपघातात दुचाकीचालक लाडू मासोड्डेकर (वय 52) रा. मासोड्डे, वाळपई हे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास गंवडाळी रेल्वे क्रॉसिंगजवळ हा अपघात झाला.

जुने गोवा पोलिसांना घटनास्थळी येऊन पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास हवालदार संतोष जाधव करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकी क्रमांक जीए.07.ई.4351 आणि दुचाकी जीए.04.टी.4526 यांची समोरासमोर टक्कर झाली. दोन्ही वाहन अतिवेगाने जात असल्याने हा अपघात झाला. चारचाकी सय्यद जाहीद हसन (ठाणे, सत्तरी) हा चालवत होता.

टक्कर एवढी भीषण होती की दुचाकीचा चुराडा झाला. चारचाकीचेही नुकसान झाले आहे. जखमी दुचाकीचालक लाडू मासोड्डेकर यांना रुग्णवाहिकेतून गोमेकॉत हलवण्यात आले. त्यांच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

फातोर्डा हॉटेलात एकाची आत्महत्या

मडगाव येथील एका निवासी हॉटेलमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी तपासासाठी पुढील प्रक्रिया सुरु केली आहे.

या व्यक्तीचे नाव मुन्नासाब बुदिमाला (वय 36) असे असून गेल्या तीन दिवसापूर्वी ही व्यक्ती गांधी मार्केट मध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी दाखल झाला होता. 06 ऑक्टोबर रोजी त्याने आत्महत्या केली होती. या विषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT