Electricity department employee died of shock  Dainik Gomantak
गोवा

Colvale News: वीज वाहिनीची तपासणी करताना बसला शॉक; वायरमनचा मृत्यू

कोलवाळ औद्योगिक वसाहतीतील घटना

Akshay Nirmale

Colvale News: गोव्यातील कोलवाळ औद्योगिक वसाहतीमध्ये आज, बुधवारी वीजेचा धक्का बसून वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लाडू विष्णू पेडणेकर असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

कोलवाळ औद्योगिक वसाहतीतील ग्लेनमार्क कंपनीजवळ असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहनीत बिघाड झाला होता. त्यामुळे या परिसरात वीजेचा लपंडाव सुरू होता. याबाबत माहिती मिळाल्यावर दुरूस्तीसाठी वीज विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले.

यावेळी लाडू पेडणेकर हे वीजेच्या खांबावर चढून वीज वाहिनीची तपासणी करत होते. यावेळी पेडणेकर यांना वीजेचा जोरदार धक्का बसला आणि ते खांबावरून खाली कोसळले. जखमी अवस्थेत त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी मालवाहू रिक्षामध्ये घालून म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात आणले.

पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी शवविच्छेदनानंतर पेडणेकर यांचा मृतदेह कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT