Surat girl Goa incident Dainik Gomantak
गोवा

सुरतला निघाली, मडगावात पोहोचली; 13 वर्षीय मुलीसोबत नेमकं काय घडलं? वाचा

Surat to Madgaon girl case: चुकीच्या रेल्वेत बसल्यामुळे थेट गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे सुरक्षा दलाने सुखरूप ताब्यात घेतले

Akshata Chhatre

मडगाव: चुकीच्या रेल्वेत बसल्यामुळे थेट गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे सुरक्षा दलाने सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर तिला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. मुलीच्या पालकांना संपर्क साधण्यात आला असून, सध्या तिला मेरशी येथील 'अपना घर' येथे पाठवण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

मडगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विक्रमजीत हे गस्त घालत असताना त्यांना एक अल्पवयीन मुलगी घाबरलेल्या अवस्थेत बसलेली दिसली. त्यांनी चौकशी केली असता, ती मुलगी एकटीच असल्याचे समजले. जवानांनी तात्काळ रेल्वे स्थानकावरील बाल मदत केंद्राला या घटनेची माहिती दिली.

बाल मदत केंद्राच्या अधिकारी लक्ष्मी यादव यांनी मुलीची चौकशी केली. त्यावेळी ती मूळची उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील असून, तिला सुरतला जायचे होते, असे समोर आले. मात्र, चुकीची गाडी पकडल्याने ती मडगावला पोहोचली होती. मुलगी केवळ १३ वर्षांची असून, कुटुंबापासून दूर इतक्या लांब आल्याने ती खूप घाबरली होती.

'अपना घर' मध्ये पाठवले

रेल्वे सुरक्षा दलाने मुलीच्या पालकांशी संपर्क साधून तिला मडगावमध्ये असल्याचे कळवले. पालक पोहोचेपर्यंत मुलीची योग्य काळजी घेण्यासाठी तिला बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले. समितीने तात्काळ कार्यवाही करून मुलीला मेरशी येथील 'अपना घर' या संस्थेत पाठवले आहे.

या संस्थेच्या माध्यमातून मुलीची काळजी घेतली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि बाल मदत केंद्राच्या सतर्कतेमुळे ही मुलगी सुखरूप सापडली असून, लवकरच तिची तिच्या कुटुंबासोबत भेट होईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

Suleman Siddiquie: जमीन हडप प्रकरणी सुलेमानला पुन्हा आणले गोव्यात! न्यायालयाचे निर्देश; 8 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी

Nobel Prize: 2025 वर्षाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुशी यांना जाहीर

"गोव्यात सुविधांचा आनंद घ्या, दिल्लीत तुम्ही हे करू शकला नाहीत", केजरीवालांना भाजपचा टोला; Post Viral

SCROLL FOR NEXT