Girish Chodankar News Updates, Goa Political News Updates Dainik Gomantak
गोवा

प्रदेशाध्यक्ष पदाला गिरीश चोडणकरांचा रामराम

कॉंग्रेसमध्ये घडामोडींना वेग: पदाधिकारी, आमदारांसह अनेकजण इच्छुक

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर विराजमान होण्यासाठी घडामोडींना वेग आला असून आमदार दिगंबर कामत यांच्यासह संकल्प आमोणकर, आलेक्स सिक्वेरा या आमदारांसह पणजीतून पराभूत झालेले विधानसभेचे उमेदवार एल्विस गोम्स हेही इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Girish Chodankar News Updates)

चोडणकर यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पुष्टी दिली आहे. चोडणकर यांनी राजीनामा काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीकडे पाठवला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष होते. या निवडणुकीत काँग्रेसला 11 जागांवरच समाधान मानावे लागले. राज्यात काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यात अपयशी ठरल्याची कबुली त्यांनी दिली होती. मतमोजणीदिवशी संध्याकाळी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पद सोडणार असल्याचे संकेतही दिले होते. राज्यात काँग्रेसला पोषक वातावरण असतानाही मतांचे विभाजन रोखण्यात, तसेच काँग्रेसकडे मते वळविण्यात गिरीश चोडणकर कमी पडले.

नेत्यांची नापसंती

चोडणकर यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यावरून काँग्रेसमधील काही नेते व आमदारांनी तेव्हा आक्षेप घेतला होता, मात्र राष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्यावर विश्‍वास दाखवला. चोडणकर यांनी काही निर्णय घेतले होते, ते काही नेते व आमदारांना आवडले नव्हते. त्यामुळे अनेक आमदार, तसेच पदाधिकारी त्यांच्यावर बरेच नाराज होते.

काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यात अपयशी ठरल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देणार असल्याचे मी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार मी राजीनामा दिला आहे. पक्षबांधणी तसेच पुन्हा नव्या जोमाने काम करीन.

- गिरीश चोडणकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT