Mangaluru - Margao Vande Bharat Express  Dainik Gomantak
गोवा

खुशखबर! गोव्याला मिळाली आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस; मंगळूरू-मडगाव मार्गावर 'या' दिवसापासून धावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण होण्याची शक्यता

Akshay Nirmale

Mangaluru-Margao Vande Bharat: गोव्यात या वर्षीपासून मडगाव-मुंबई रेल्वेमार्गावर वंदे भारत या हायस्पीड एक्सप्रेस रेल्वेगाडीची सुरवात झाली होती. आता गोव्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे.

कर्नाटकातील मंगळूरू ते मडगाव या मार्गावर ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. येत्या 30 डिसेंबर पासून या सेवेस सुरवात होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीसह इतरही पाच मार्गांवरील वंदे भारत गाड्यांना आभासी पद्धतीने झेंडा दाखवला जाणार आहे, असे समजते.

दरम्यान, कर्नाटकमधील दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी 22 सप्टेंबर 2023 रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंगळुरू-मडगाव, मंगळुरू-तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू-बेंगळुरू दरम्यान वंदे भारत सेवांसाठी जोरदार भूमिका मांडली होती.

आता मंगळुरु सेंट्रल-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दक्षिण रेल्वे सज्ज झाली आहे.

पलक्कड विभागाने याला दुजोरा दिला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरुण कुमार चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, विभागाने मंगळुरू सेंट्रल येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर या गाडीसाठी विस्तृत तयारी केली आहे.

अशा असतील वेळा...

तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, ही रेल्वे मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी 8.30 वाजता निघेल आणि दुपारी 1.05 वाजता मडगावला पोहोचेल. या दोन्ही स्थानकांमधील अंतर सुमारे 320 किलोमीटर इतके आहे. उडुपी आणि कारवार हे या मार्गावरील थांबे आहेत.

परतीच्या प्रवासात, वंदे भारत एक्सप्रेस मडगावहून संध्याकाळी 6.10 वाजता सुटेल आणि मंगळुरु सेंट्रलला रात्री 10.45 वाजता पोहोचेल. अर्थात हे तात्पुरते वेळापत्रक आहे, कालांतराने वेळा निश्चित्त केल्या जातील.

दरम्यान, वंदे भारत सेवेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी मंगळुरु सेंट्रल येथे दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म 4 आणि 5 यांचेही लोकार्पण करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT