GST Rates Increases Dainik Gomantak
गोवा

Goa GST Collection: गोव्यासाठी खुशखबर! जीएसटी संकलनात 32 टक्के वाढ

6 वर्षांचा रेकॉर्ड मोडत 1.87 लाख कोटींचा जीएसटी जमा

Rajat Sawant

Goa GST Collection April 2023: गोव्यात मासिक जीएसटी संकलनात 32 टक्के वाढ झाली आहे. स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम, EoDB गोव्याला आर्थिक विकासाच्या मार्गावर आणत आहे. अधिक आर्थिक संधी प्रदान करत आहे अशी माहिती मुख्यंमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

एप्रिल महिन्यातील जीएसटी करवसुलीचे आजवरचे सर्व विक्रम मोडत, नवा उच्चांक गाठला आहे. एप्रिलमध्ये तब्बल 1 लाख 87 हजार कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पीआयबीने आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली.

मुख्यंमंत्री डॉ. सावंत म्हणाले, "गोव्यात मासिक जीएसटी संकलनात 32 टक्के वाढ झाली आहे. स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम, EoDB गोव्याला आर्थिक विकासाच्या मार्गावर आणत आहे, अधिक आर्थिक संधी प्रदान करत आहे.

कमी दर असूनही जीएसटीतून वाढणारा महसूल हा सुधारित कर अनुपालन, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण दर्शवते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एप्रिल 2023 मध्ये 1 लाख 87 हजार कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झालं आहे. जीएसटीचं एप्रिल 2022 मध्ये 1 लाख 68 रुपयांचं संकलन झालं. एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये 19 हजार 495 कोटी रुपयांचं संकलन जास्त झालं आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT