Good Friday In Goa Dainik Gomantak
गोवा

Good Friday In Goa: मोती डोंगरावर येशूच्या बलिदानाचे स्मरण; शेकडोंचा सहभाग

दक्षिण गोव्यात गुड फ्रायडेनिमित्त अनेक ठिकाणी प्रार्थना

दैनिक गोमन्तक डिजिटल

गुड फ्रायडेनिमित्त येथील मोती डोंगरावर असलेल्या कपेलसमोर 25 फूट उंच क्रॉसवर येशू ख्रिस्ताची प्रतिमा चढवून त्यांचे स्मरण करण्यात आले. यावेळी हिंदू भाविकही सहभागी होत असल्याने या संस्मरण कार्यक्रमाला धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.

सकाळी येशूची प्रतिमा साकारल्यानंतर दुपारी भाविकांच्या उपस्थितीत ती खाली उतरविण्यात आली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना झाल्यावर सायंकाळी येशूची मोती डोंगरावरून यात्रा काढण्यात आली.

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या होली स्पिरीट चर्चमध्ये यात्रेची सांगता झाली. यात शेकडो भाविकांनी सहभाग घेतला होता. सासष्टी तालुक्यातील कोलवा, बाणावली, माजोर्डा, बेतालभाटी, कुंकळ्ळी, वेळ्ळी, तसेच अन्य गावांत गुड फ्रायडेनिमित्त प्रार्थना करण्यात आली.

धार्मिक सलोख्याचे प्रतीक

मोती डोंगरावर एवढ्या उंचीवर येशूची प्रतिमा साकारणारे सासष्टी तालुक्यातील हे एकमेव ठिकाण आहे. या स्मरण विधीनंतर सायंकाळी येशूची यात्रा काढली जाते. तेव्हा येशूची प्रतिमा ठेवलेल्या पेटीला एक खांदा हिंदू धर्माचे लोक देतात. पूर्वी या ठिकाणी जे मंदिर होते, त्या मंदिराच्या महाजनांना हा मान दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT