Student Return from Ukraine  Dainik Gomantak
गोवा

मृत्युच्या जबड्यातून सुटून गोमंतकीय विद्यार्थी जेडेन मायभूमीत

‘गोमन्तक’शी संवाद: रशिया-युक्रेन युद्धामुळे एक महिना होता तणावाखाली

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: कानावर सतत येऊन आपटणारा बॉम्बचा आवाज, शेवटच्या दोन आठवड्यात अन्नाचा साठा संपल्याने एकाच जेवणावर काढला जाणारा दिवस आणि त्यातच लांबत गेलेली सुटका... अशा परिस्थितीत कधी बंकरमध्ये तर कधी हॉस्टेलच्या बंद खोलीत असा संपूर्ण एक महिना भीतीच्या तणावाखाली काढलेला बाणावली येथील जेडन परेरा हा 19 वर्षीय गोमंतकीय विद्यार्थी आज शनिवारी गोव्यात पोहोचला.

‘युक्रेनमधला प्रत्येक दिवस आम्हाला आमचा शेवटचा दिवस तर नाही ना असेच वाटायचे. आम्ही सुमारे 500 भारतीय विद्यार्थी तिथे अडकलो होतो.

आम्ही आमच्या घरी पोहोचणारच नाहीत ना अशी शंका आम्हाला क्षणोक्षणी यायची', ‘गोमन्तक’शी बोलताना जेडनने आपले ते भीषण अनुभव सांगितले. दरम्यान, राज्य प्रशासनातर्फे त्याचे स्वागत करण्यासाठी सासष्टीच्या संयुक्त मामलेदार सीमा गुडे या स्वतः उपस्थित होत्या. आई अनिता यांना आपला मुलगा सुखरूप परत आल्याचे पाहून जीवात जीव आला. यासाठी त्यांनी केंद्र व राज्य सरकार आभार मानले.

सैनिकांचा मज्जाव: जेडनसह इतर विद्यार्थी सुमी शहरात अडकले होते. हे शहर रशियाच्या अगदी जवळ असल्याने युक्रेनचे सैनिक त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सीमा ओलांडून रशियात जाऊ देत नव्हते. यामुळे त्यांचे भारतात परतणे कठीण झाले होते.

क्षेपणास्त्र हल्ले पाहिले

वास्तविक आम्हाला ज्या शहरात हलविले ते शहर बसमधून तीन तासांत गाठता येते. पण त्यावेळी रस्त्यांवर बॉम्ब वर्षाव चालूच होता. त्यामुळे आडवाटेने आम्हाला हे शहर गाठावे लागले. हा प्रवास तब्बल 13 तास लांबला. रस्त्यावरून जाताना मध्येच क्षेपणास्त्र फुटल्याचेही आम्ही पाहिले. हा सारा अनुभव भीतीदायक होता असे तो म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT