Abhijit Pawar | Gomantak Tanishka Launch in Goa Dainik Gomantak
गोवा

स्त्री हीच भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा

अभिजीत पवार यांच्या हस्ते ‘गोमन्तक’च्या तनिष्का महिला व्यासपीठाचे शानदार उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

वाळपई : भारतीय तत्वज्ञानात आणि संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला देश या व्यवस्थेवरच उभा आहे. घरातील स्त्री हाच त्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. हा कणा जितका मजबूत आणि खंबीर तितके कुटुंब परिपूर्ण असे प्रतिपादन सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी केले. ‘गोमन्तक’च्या तनिष्का या महिला व्यासपीठाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.

वाळपई येथील कदंब सभागृहात रविवारी (24 जुलै) आयोजित या कार्यक्रमाला सकाळ माध्यम समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक, ‘तनिष्का’च्या संचालिका मनस्विनी प्रभुणे नायक आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले,‘‘वसुधैव कुटुम्बकम’ ही आपली संस्कृती आहे. केवळ स्वतःचा विचार न करता संपूर्ण जगावर, त्यातील निसर्गावर, प्रत्येक प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचे संस्कार आपल्यावर आहेत. या आपल्या तत्वज्ञानाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करणे ही येथे उपस्थित प्रत्येक भगिनीची जबाबदारी आहे. आपले जीवन हा एक उत्सव आहे. ते जगणे हे आनंदात साजरे व्हायला हवे, गोव्यातील माता भगिनी प्रत्येक सण उत्सव, घरातील कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरे करून ती संस्कृती जपतायत याचा मला आनंद आहे. ही कला, संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान आपल्याला जगभरात पोहोचवायचे आहे. स्त्रियांना समाजात केवळ समान स्थान नाही तर प्रतिष्ठा मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. तिच्यात असंख्य गुण, कला, मातृत्व, संस्कार आहेत. त्यामुळेच भारतीय संस्कृती शतकानुशकते टिकून आहे.’

प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची गरज
घरातील नित्य कर्मे, व्रत वैकल्य, उपासना, शिक्षण पद्धती या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक शास्त्र आहे. प्रत्येक कृतीला काही वैज्ञानिक आधार आपल्या पूर्वजांनी अभ्यासपूर्वक दिला आहे. आपण पूर्वापार एखादी कृती का करतो? त्यामागे शास्त्र काय असू शकेल ? असे प्रश्न आपल्याला पडणे आवश्यक आहे. अशा सर्वच प्रश्‍नांची उत्तरे पुढील काळात ‘गोमन्तक’ आणि ‘तनिष्का’च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. महिलांनी देखील चिकित्सक वृत्तीने या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेतली पाहिजेत असे मत अभिजीत पवार यांनी व्यक्त केले.

‘तनिष्का’ हा केवळ एक महिलांचा समूह नसून महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी चळवळ आहे. कार्यक्रमातील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मला खात्री आहे, की प्रत्येक गावात तनिष्का व्यासपीठाच्या महिला अतिशय आदर्शवत काम करतील, असंही अभिजीत पवार पुढे म्हणाले.

उदय जाधव यांनी महिला एकत्र येऊन आपल्या प्रश्‍नांवर, संस्कृतीवर काम करत आहेत याबद्दल आनंद व्यक्त करून ‘तनिष्का’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वर्षा मुळीक चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले तर मनस्विनी प्रभुणे नायक यांनी आभार मानले.

गोवा हा सर्वोत्तम आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. प्रत्येक घरात महिलेने हा आपलेपणा जपला आहे. ही परंपरा आपल्याला वाढवायची आहे. ‘तनिष्का’च्या माध्यमातून महिलांनी भवितव्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी पुढे यावे. ‘तनिष्का व्यासपीठाच्या महिलांच्या प्रत्येक प्रश्‍नात आणि कार्यक्रमात आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत, असं गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT