Raksha Bandhan  Daink Gomantal
गोवा

रक्षिता तुम्‍ही स्‍वातंत्र्या प्राणास घेऊनी हाती! ‘गोमन्तक’च्या महिला कर्मचाऱ्यांकडून रक्षाबंधन

Rakshabandhan Special 2024: ‘गोमन्तक’च्या महिला कर्मचाऱ्यांनी जवानांना राखी बांधून बहीण भावाच्या रक्तापलीकडील नात्याला बळकट केले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वेगवेगळ्या माध्यमांतून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात येत असून ‘गोमन्तक’तर्फे यावर्षी देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेल्या जवानांसाठी रक्षाबंधन विशेष कार्यक्रम आयोजित केला. ‘गोमन्तक’च्या महिला कर्मचाऱ्यांनी जवानांना राखी बांधून बहीण भावाच्या रक्तापलीकडील नात्याला बळकट केले.

बांबोळी मिलिटरी कॅम्प येथील २ सिग्नल ट्रेनिंग सेंटर आणि ३ टेक्निकल ट्रेनिंग रेजिमेंटच्या सहयोगाने गोमन्तक आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात जवानांना राखी बांधून त्यांच्याशी भावनिक नाते जोडण्यात आले. यामध्ये पणजी येथील अनम प्रेम संस्था, ऋग्णासहायत्ता मातृछाया बांबोळी, रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट पर्वरी या संस्थांतर्फे देखील जवानांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी लेफ्टनंट पी.एस.तोमार, कर्नल उदयसिंग राठोड, गोमन्तकचे महाव्यवस्थापक विजू पिल्ले, व्यवस्थापक संजय पाटील आणि सहाय्यक व्यवस्थापक भारत पोवार उपस्थित होते.

भारत पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, रक्षाबंधन हे एक पावन पर्व आहे. देशाच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर राहत असलेल्या जवानांना बहिणीने राखी बांधून त्यांच्याशी अतूट नाते जोडले पाहिजे. एक बहीण भावाच्या हातावर धागा बांधून भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीची सुरक्षा निश्चित करतो.

जवानांकडून ‘गोमन्तक’चे आभार

सुभेदार पी. एस. तोमार यांनी सर्व जवानांच्या वतीने गोमन्तक आणि आयोजकांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, एक उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करून आम्हा सर्व जवानांना एक नवीन ऊर्जा दिली. अशाच पद्धतीचे कार्यक्रम यापुढे देखील गोमन्तकने आमच्यासोबत करावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

बहिणींची सुरक्षा करू; आर. ए. सिंग

हवालदार आर. ए. सिंग यांनी सांगितले की, भारत देशात रक्षाबंधन हा महत्त्वपूर्ण सण आहे. बहीण आणि भावांमधील नाते दर्शविणाऱ्या दिवशी जवानांना राखी बांधून बहिणीने आपले कर्तव्य केले. बहिणीची सुरक्षा जोपासून आता आम्ही त्यांची सुरक्षा केली पाहिजे. कुठल्याही बहिणीला गरज पडली तर आम्ही सर्व बंधू हजर राहू, असे वाचनही प्रसंगी त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT