Damodar Mauzo Dainik Gomantak
गोवा

Gomantak Marathi Academy: मराठीच्या वाटेला जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका... दामोदर मावजोंच्‍या वक्तव्‍याचा गोमंतक मराठी अकादमीकडून निषेध

Damodar Mauzo statement: गोव्याच्या राजभाषा कायद्यात मराठीचा समावेश नको, असे वादग्रस्‍त विधान कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याच्या राजभाषा कायद्यात मराठीचा समावेश नको, असे वादग्रस्‍त विधान कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी केले आहे. या विधानाचा आम्ही मराठीप्रेमी तीव्र निषेध करतो. ज्ञानपीठकारांनी आपल्या भाषेचे काय ते बघावे, मराठीवर विनाकारण दुगाण्या झाडू नयेत, मराठीच्‍या वाटेला जाऊ नये, असे गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमोणकर यांनी कोकणी कार्यशाळेत मावजो यांनी मराठीबाबत केलेल्‍या विधानाचा खरमरीत समाचार घेतला. आमोणकर यांनी म्हटले आहे की, ‘गोव्याच्या भाषावादामागील कारस्थान’ या रामनाथ ग. नाईक यांच्या पुस्तकात मावजो यांच्यासारख्या अनेकांच्‍या कटकारस्थानांचा पुराव्यानिशी भांडाफोड केलेला आहे. गोमंतकीय मराठीच्या तळपत्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या काजव्यांनी उसन्‍या प्रकाशात फार उडू नये.

म्हापशात आज करणार जाहीर निषेध

राजभाषा कायद्यात मराठीला स्थान नको, असे मत ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी व्यक्त केल्याप्रकरणी उद्या शुक्रवारी ३० रोजी सकाळी १०.३० वाजता म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मराठीप्रेमींकडून त्‍यांचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे. समस्‍त मराठीप्रेमींनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक ॲड. महेश राणे व तुषार टोपले यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT