Gomantak Impact News Dainik Gomantak
गोवा

Gomantak Impact: रेडेघाटी, नागवे येथील कचऱ्याची साफसफाई; म्हाऊसी पंचायतीने घेतली वृत्ताची दखल

म्हाऊसी पंचायत क्षेत्रातील नागवे येथील वाळपई रेडेघाटी रस्त्याच्या बाजूला वारवार मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.

दैनिक गोमन्तक

Gomantak Impact: म्हाऊसी पंचायत क्षेत्रातील नागवे येथील वाळपई रेडेघाटी रस्त्याच्या बाजूला वारवार मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. यासंबंधीचे वृत्त ‘गोमन्तक’ मध्ये प्रसिद्ध होताच आज मंगळवारी म्हाऊसी पंचायतीतर्फे या परिसराची साफ सफाई करण्यात आली.

यासंदर्भात, पंचायत सचिव संदीप हल्याळी म्हणाले, की आम्ही म्हाऊसी पंचायत क्षेत्र कचरा मुक्त करण्याच्या मार्गावर आहोत. त्याप्रमाणे गावात स्वच्छता मोहीमेद्वारे साफ सफाई केली जात आहे. मात्र नागवे परिसरात मुद्दामहुन काही जण कचरा टाकतात.

यापुढे या परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच लवकरच सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांनी कचरा टाकताना खबरदारी घ्यावी.

अज्ञाताकडून कचराफेक

वाळपई होंडा रस्त्याच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला रेडेघाटी येथे रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीकडून कचरा फेकला जात आहे. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. तसेच हा टाकावू कचरा भटकी गुरे तसेच इतर रानटी जनावरेही खातात.

त्यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात येत आहे, याकडे ‘गोमन्तक’ ने लक्ष वेधले होते. हे वृत्त प्रसिध्द होतात म्हाऊसी पंचायतीने मंगळवारी सकाळपासून परिसराची साफ सफाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT