Gomantak Bhandari Samaj Election  Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: निवडून आल्यानंतर 'जैसे थे' आदेश! भंडारी समाजाच्या निवडणूक प्रक्रियेत नाट्यमय वळण

Gomantak Bhandari Samaj: ‘गोमंतक भंडारी समाज’ या संस्थेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले देवानंद नाईक यांचा आनंद आज औटघटकेचा ठरला. या निवडणूक प्रक्रियेत ‘जैसे थे’ स्थिती ठेवावी, असा आदेश जिल्हा संस्था निबंधकांनी आज दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Bhandari Samaj Election

पणजी: ‘गोमंतक भंडारी समाज’ या संस्थेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले देवानंद नाईक यांचा आनंद आज औटघटकेचा ठरला. या निवडणूक प्रक्रियेत ‘जैसे थे’ स्थिती ठेवावी, असा आदेश जिल्हा संस्था निबंधकांनी आज दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ नोव्‍हेंबर रोजी होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

संस्थेच्या केंद्रीय समिती निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अशोक नाईक गटाच्या विरोधकांनी सादर केलेले २१ पैकी २० अर्ज आज छाननीवेळी फेटाळण्यात आले. त्‍यामुळे सत्ताधारी गटाचे १४ सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. मात्र त्‍यानंतर काही वेळातच ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा हा आदेश जारी झाला आहे.

कोणत्याही संस्थेची नवी समिती कार्यान्वित होण्यासाठी जिल्हा संस्था निबंधकांची मान्यता लागते. ती अद्याप नव्या समितीने न घेतल्याने उद्यापासून नवी समिती काम करू शकणार नाही. जुनीच समिती सध्या अस्तित्वात आहे.

अशोक नाईक यांच्या समितीने घेतलेल्या मुदतवाढीला जिल्हा निबंधकांसमोर आव्हान देण्यात आले होते. त्यावेळी ती समिती रद्द करून प्रशासक नियुक्तीचा आदेश देण्यात आला होता. त्यास नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले तेव्हा नोटिशीतील त्रुटी समोर आल्या. त्यामुळे उच्च न्यायालयाने ही प्रक्रिया पुन्हा करण्याचा आदेश जिल्हा निबंधकांना दिला होता. त्यानुसार आज ही सुनावणी झाली.

भंडारी समाजविषयक तीन महत्त्‍वपूर्ण घडामोडी आज प्रस्तावित होत्या. त्यात अर्ज छाननी व या सुनावणीव्यतिरिक्त जिल्हा न्यायालयातील सुनावणीचा समावेश होता. सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी बोलावलेल्या आमसभेला अशोक नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडून स्थगिती मिळवली होती. त्यास गावकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही.

निवडणूक समितीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, निवडणुकीसाठी ५५ अर्ज दाखल झाले होते. निवडणूक समितीचे अध्यक्ष रामदास पेडणेकर यांनी सांगितले की, सर्व अर्जांची काळजीपूर्वक छाननी केली आणि पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT