Ravi Naik|Goa Bhandari Samaj Canva
गोवा

Bhandari Community In Goa: भंडारी समाजाच्या नवीन संघटनेला 'कृषिमंत्र्यांचा पाठिंबा'? विरोधकांच्या हालचालींना जोर

Gomantak Bhandari Samaj: अध्यक्ष अशोक नाईक यांनी ६ रोजी वास्को येथे बोलावलेल्या आमसभेआधी काहीतरी ठोस निर्णय घेण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी हालचाल सुरू केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Bhandari Samaj Goa

पणजी: गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी ६ रोजी वास्को येथे बोलावलेल्या आमसभेआधी काहीतरी ठोस निर्णय घेण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी हालचाल सुरू केली आहे. कृषिमंत्री रवी नाईक यांचा या हालचालींना आशीर्वाद असून काल त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दुसरी समाज संघटना स्थापन करण्याच्या पर्यायावरही चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

समाज संघटनेचे सरचिटणीस या नात्याने उपेंद्र गावकर यांनी बोलावलेल्‍या संघटनेच्या आमसभेला अध्यक्ष अशोक नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाकडून स्थगिती मिळविली आहे. ती स्थगिती उठविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

रवी नाईक-अशोक नाईक भेटीचा किस्सा

मंत्री रवी नाईक यांनी सोमवारी फोंड्यात राज्यभरातील भंडारी समाजाच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना बोलावले होते; पण मुद्दाम दोघा नेत्यांना बोलावले नव्हते. या बैठकीत रवी नाईक यांनी आपल्याला पूर्वकल्पना न देता अशोक नाईक यांची समिती कशी भेटायला आली, याचा किस्सा सांगितला. त्यावेळी नवी संघटना स्थापन झाल्यास ३ कोटी रुपये खर्च कऱण्याची तयारीही दर्शवण्यात आली. दोन संघटना केल्यास समाजबांंधव बिथरतील म्हणून आहे तीच समाज संघटना निवडणुकीतून ताब्यात घेण्याविषयी चर्चा करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT