CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

BJYM Goa गरिबांसाठी बांधून देणार चार घरे; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनानिमित्त गणवेश वाटप

असा असेल मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम

दैनिक गोमन्तक डिजिटल

BJYM Goa : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या डॉ. प्रमोद सावंत यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. याबरोबरच भाजयुमोनेही विविध उपक्रम आयोजित केले आहेत, तर प्रशासकीय पातळीवर आणि विविध सामाजिक संस्था, बिगर सरकारी संस्था या वाढदिवस सोहळ्यात सहभागी होत आहेत.

पक्षाचे सरचिटणीस आणि युवा मोर्चाचे प्रभारी दामू नाईक आणि अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा 50 वा वाढदिवस आम्ही ‘हटके’ पद्धतीने साजरा करत आहोत.

सेवा, सुशासन आणि जनकल्याण या तत्त्वानुसार मुख्यमंत्री उद्या, सोमवारी दिवसभर विविध उपक्रमांमध्ये सहभागी असतील. मांद्रेकर म्हणाले की, युवा मोर्चाच्या वतीने राज्यातील 4 गरीब लोकांना घरे बांधून देण्यात येतील. यात डिचोली येथील सदा मांद्रेकर, पेडणे येथील विनया मळीक, काणकोणचे दिलखुश रायकर आणि सांगे येथील गणेश गावकर यांचा समावेश आहे.

याशिवाय प्रत्येक मतदारसंघांमध्ये एक विशेष कार्यक्रम होईल. या कार्यक्रमामध्ये राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या सरकारी शाळेत शिकणाऱ्या १० हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचे कापड देण्यात येईल. शिवाय फळे आणि रोपे वाटप होईल. गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात येईल.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम

  • स. ८:३० वा. शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या मंदिराला भेट

  • स. ९ वा. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवाच्या लाभार्थी जयंती सातार्डेकर (अस्नोडा) यांच्या घरी भेट

  • स. १०:३० वा. साळगाव ग्रामपंचायतीला भेट

  • स. १०.४५ ते ११ लाईव्ह सत्राद्वारे सर्व पालिका व पंचायतींशी संवाद

  • स. ११ वा. स्वयंपूर्ण मित्राच्या भूमिकेतून जनतेच्या तक्रारींचे निराकरण

  • दु. १२ वा. साळगाव येथील मिलाग्रीस चर्चला भेट

  • दु. ३ वा. कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाअंतर्गत ''शिक्षा संगम'' उपक्रमाला हजेरी

  • दु. ४ वा. भाजप कार्यालयात लोकांच्या तक्रारी, भेटीसाठी उपलब्ध

  • सायं. ७.३० वा. साखळी येथील श्री राधाकृष्ण मंदिरात वाढदिवसाची सांगता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT