Goa State Bank : Dainik Gomantak
गोवा

Goa State Bank : गोवा राज्य बॅंकेची स्थिती भक्कम; उल्हास फळदेसाई

Goa State Bank : 31 मार्चनंतर डिजिटल बॅंकिंग सेवा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा राज्य सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती आता भक्कम असून येत्या 31 मार्च नंतर डिजिटल बॅंकिंग सेवा दिली जाईल. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी नवनव्या योजना राबवून सदर बॅंक मॉडर्न बॅंक केली जाईल, अशी माहिती या बॅंकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा बॅंकेला 6 कोटी 95 लाख रुपये नफा मिळाला. अनेक वर्षांनंतर ही बॅंक पहिल्यादाच योग्य नफ्यात आल्याचे ते म्हणाले.

गेल्या वर्षी या बॅंकेला 1 कोटी 28 लाख रुपयांचा नफा झाला होता. आता यापुढे ही बॅंक सदैव नफ्यात ठेवण्याचे प्रयत्न असतील, असे सांगताना 31 मार्च 2022 पर्यंत बॅंकेकडे 2161 कोटी 15 लाख रुपये ठेवी होत्या, तर एकूण 1140 कोटी रुपये कर्ज दिलेले आहे. 1195 कोटी रुपये गुंतवणूक असून एनपीए 61 कोटी 71 लाख रुपये असल्याचे ते म्हणाले.

त्यात चिंता करण्याचे कारण नसून टक्केवारी पाहता ती फक्त 4.26 इतकी आहे. रिझर्व बॅंकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही टक्केवारी खरेतर 3 टक्या पेक्षा कमी असायला हवी, तरच नेट बॅंकींगची सुविधा देणे सुरू करता येते. येत्या मार्चपर्यंत ही टक्केवारी ३ पेक्षा खाली येईल व या बॅंकेत डिजिटल बॅंकिंग सेवा सुरू होईल असे ते म्हणाले.

बॅंकेच्या 54 शाखा कार्यरत

या बॅंकेच्या 54 शाखा आहेत. म्हापसा अर्बन आणि मडगाव अर्बन या दोन बॅंकांची स्थिती खराब झाल्यावर गोवा राज्य सहकारी बॅंकेवरही परिणाम झाला असे सांगताना आता बॅंक बऱ्यापैकी सावरली असून ही एकमेव राज्याची बॅंक म्हणता येईल, अशी आहे. त्यामुळे लोकांनी डोळे झाकून विश्‍वास ठेऊन व्यवहार करावा, असे ते म्हणाले.

गृहकर्ज फक्त 25 लाखापर्यंतच देण्याची मुभा होती, आता वाढवून 50 लाखापर्यंत झाली आहे. पुढील वर्षी ती 75 लाखापर्यंत होईल, असे त्यांनी सांगितले. खाते धारकांच्या दरवाजापर्यंत बॅंक पोचवण्यासाठी 2 खास वाहने घेण्यात आली आहेत. त्यात एटीएम मशीन व बॅंक काउंटर सुविधा असून ज्येष्ठ नागरिकांना या सेवेचा अधिक लाभ होत असल्याचे ते म्हणाले.

दक्षिण गोव्यात गेली दीड वर्ष ही बॅंक सेवा सुरू असून गेल्या 6 महिन्यापासून उत्तर गोव्यात सेवा सुरू झाली आहे. या मोफत सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अशाच प्रकारची अजून दोन वाहने विकत घेऊन या सेवेत वाढ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

SCROLL FOR NEXT