Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात फातोर्डा युवा शक्तीने नरकासुर वध स्पर्धेचे केले आयोजन

पाहिले बक्षीस 1 लाखाचे, एकूण बक्षिसे 4 लाखांच्या वर

दैनिक गोमन्तक

दोन वर्षांच्या विसाव्या नंतर फातोर्डा येथील फातोर्डा युवा शक्तीतर्फे यंदा पुन्हा एकदा श्रीकृष्ण विजय उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून गोव्यातील ही सर्वाधिक रकमेची ही स्पर्धा असेल. या स्पर्धेतील विजेत्या नरकासुर प्रतिमेला 1 लाखाचे पाहिले बक्षीस दिले जाणार असून एकूण बक्षिसांची रक्कम 4 लाखांच्या घरात जाणारी आहे.

या संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक रवींद्र नाईक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. व्ही फॉर फातोर्डा या आमदार विजय सरदेसाई यांच्या प्रतिष्ठानाच्या सौजन्याने ही स्पर्धा 3 नोव्हेंबर रोजी मडगावच्या एसजीपीडीए पार्किंग लॉटवर ही स्पर्धा होणार आहे. यंदाचे हे या स्पर्धेचे आठवे वर्ष आहे.

या स्पर्धेत दुसरे बक्षीस 75 हजार, तिसरे 50 हजार तर 15 हजार रुपयांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे असतील. उत्कृष्ट कृष्णासाठी पाहिले 21 हजार, दुसरे 15 हजार तर तिसरे 10 हजाराचे बक्षीस असेल. उत्कृष्ट वादनासाठी 15 हजार, 10 हजार व 5 हजार अशी तीन बक्षिसे तर उत्कृष्ट तीन पारंपरिक लहान नरकासुरांसाठी 10 हजारांची तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत असे नाईक यांनी सांगितले.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येणाऱ्या पहिल्या 15 नरकासुरांसाठी 5 हजार रुपयांचे खास बक्षीस दिले जाणार असून जर या 15 पैकी ज्या नरकसुरांना मुख्य स्पर्धेत कुठलेही बक्षिस मिळाल्यास ही रक्कम नंतरच्या क्रमाकांच्या नरकासुर पथकाना दिली जाणार आहे असे नाईक यांनी सांगितले. यावेळी लोकांच्या मनोरंजनासाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम असेल असे त्यांनी सांगितले.

मागच्या वर्षी कोविडमुळे तर त्यापूर्वी वादळ आल्यामुळे ही स्पर्धा घेतली नव्हती मात्र यावेळी नरकासुर करणाऱ्या संस्था आणि लोकांकडून ही स्पर्धा घ्याच असा आग्रह झाल्याने आम्ही ही बाब आमदार विजय सरदेसाई यांच्या कानांवर घातली. त्यांनीही चला पुढे असे म्हणत सर्व सहकार्य करण्याची तयारी दाखवली असे नाईक म्हणाले. ही स्पर्धा कोविडचे सर्व एसओपी पाळूनच आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रवीण नाईक, परेश नाटेकर तसेच हर्षद नायक हे उपस्थित होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT