Goa Taxi App  Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi App: स्थानिक व्यवसाय मोडीत काढण्याचा सरकारचा डाव; टॅक्सी चालकांचा ॲपला विरोध

Pramod Yadav

Goa Taxi App: राज्यातील स्थानिक टॅक्सी चालकांच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण न करता राज्य सरकार टॅक्सी अ‍ॅप पुढे रेटत आहे. सरकारचे हे वागणे म्हणजे स्थानिक टॅक्सी व्यवसाय मोडीत काढण्याचा स्पष्ट डाव आहे, असा दावा स्थानिक टॅक्सी चालक करीत आहेत.

टॅक्सी मीटरची सक्ती, अवाजवी देखभाल शुल्क, ऑनलाइन टॅक्सी अ‍ॅप आदी समस्या न सोडविल्यामुळे स्थानिक टॅक्सीचालक खूष नाहीत.

गोवा टुरिस्ट टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष चेतन कामत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, परिवहन विभाग आणि मंत्री केवळ टॅक्सी अ‍ॅप पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्थानिक टॅक्सी चालकांना निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नाही.

ते पुढे म्हणाले की, टॅक्सी चालकांचे अनेक प्रश्न आहेत. जे परिवहन विभागासमोर मांडण्यात आले परंतु आजपर्यंत एकही प्रश्न परिवहन विभागाने सोडवला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकार टॅक्सी अ‍ॅपला मदत करत आहे, असे ते म्हणाले.

पिवळ्या काळ्या करमळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सुनील नाईक यांनीही टॅक्सी अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. स्थानिक टॅक्सी व्यवसाय नष्ट करण्याची योजना आहे, असे ते पुढे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT