Goa Fish Exort  Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Export: गोव्यातील मासळी निर्यातीचा टक्का घसरला; निर्यातदारांमध्ये निराशा

Fish Exporters: अमेरिकेमध्ये १५६९ टन तर चीनमध्ये २५९३ टन मासळी निर्यात करण्यात येते

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: गोव्यातील मासळीचा दर्जा उच्च प्रतीचा आहे. शिवाय येथील मासळीला आंतरराष्ट्रीय मार्केट मोठे आहे, तरी देखील गेल्या दोन वर्षांत निर्यातीचा टक्का घसरलेला असल्याने निर्यातदारांमध्ये थोडी निराशा पसरलेली आहे.

अमेरिका व चीनमध्ये मासळी जास्त निर्यात केली जाते. अमेरिकेमध्ये १५६९ टन तर चीनमध्ये २५९३ टन मासळी निर्यात करण्यात येते. शिवाय दक्षिण पूर्व आशिया, युरोपियन देश, मध्य पूर्व देशांमधूनही गोव्यातील मासळीला मागणी येत असते.

कटलफिश व स्क्विड या मासळीला जास्त मागणी आहे. २०२३ साली कटलफिशची २२५२ टन निर्यात झाली होती. तत्पूर्वी २०२२ मध्ये १८४६ टन निर्यात झाली होती. गोठलेल्या कटलफिशला सुद्धा मागणी असून २०१८-१९ साली अशा प्रकारची ३८१३ लाख रुपयांची १२६५ टन मासळी निर्यात करण्यात आली होती. मात्र २०२३-२४ साली केवल १९२ लाख रुपये किमतीची ६०० टन गोठलेली कटलफिशची निर्यात करण्यात आली होती. निर्यातीचा घसरलेला टक्क्यामुळे निर्यातदार चिंताग्रस्त झाले आहेत.

मरिन प्रॉडक्टस एक्स्पोर्ट डेव्हलॉपमेंट ओथोरिटीने जो डाटा सादर केला आहे, त्याप्रमाणे २०२२-२३ साली सागरी अन्नाची निर्यात १००७६१ लाख रुपये किमतीची ६३३३३ टन एवढी झाली होती, मात्र २०२३-२४ काळात निर्यात जवळ जवळ १४ टक्क्यांनी घटली आहे. यंदा ५५१६७ टन व किंमत ९३४२० लाख रुपयांचीच निर्यात शक्य झाली आहे.

जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये जे भौगोलिक राजकारण सुरु आहे त्याचा परिणाम मासळी निर्यातीवर झाला असल्याचे मत भारतीय सागरी अन्न निर्यातदार असोसिएशनचे गोवा क्षेत्रीय अध्यक्ष मौलाना इब्राहिम यांनी मांडले आहे. गाझा व युक्रेनमध्ये जे युद्ध सुरु आहे, त्याचा सुद्धा परिणाम मासळी निर्यातीवर होताना दिसत असल्याचे मौलाना इब्राहिम सांगतात.

कोविड महामारीनंतर सागरी अन्न निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एरव्ही युरोपियन देशांतील मार्केटमध्ये सागरी अन्नाला चांगली मागणी होती. पण आता १०० कंटेनरवरुन ची ५०-६० कंटेनरपर्यंत घटली आहे, असे इब्राहिम सांगतात.

हे व्यापारी क्षेत्र कामागांराभिमुख असल्याने निर्यातदार व मजुरांसाठी प्रोत्साहन, अनुदान, निर्यात धोरण विकासाला चालना देणे हे अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे असल्याचेही इब्राहिम सांगतात. त्याच प्रमाणे गोव्यातील मासळी जेटीचा दर्जासुद्धा वाढविणे महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.

वेगवेगळ्या जागतिक आव्हांनामुळे घट शक्य

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) चे निवृत्त ज्येष्ठ प्राचार्य प्रो. अनंत श्रीपाद यांच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या जागतिक आव्हांनामुळे ही निर्यात घटण्याची शक्यता आहे. मागणी मधील चढ उतार व नियामक बदल यांचा त्यात समावेश होऊ शकतो. २०१९ सालातील कोविड काळानंतर जागतिक स्तरावर जे वेगवेगळे बदल झाले, त्यामुळे सुद्धा ही निर्यात घटण्याची शक्यता असू शकते असे त्यांचे मत आहे. निर्यातीतील आव्हान टिकविण्यासाठी व १४ टक्क्यातील तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांच्या बदलत असलेल्या पसंतीची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त ठरेल असेही ते सल्ला देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT