Goa GST Revenue Dainik Gomantak
गोवा

Goa GST Revenue: पर्यटनाचा लाभ! गोव्याच्या जीएसटीत 20 टक्क्यांनी वाढ, डिसेंबरमध्ये राज्याला मिळाले 553 कोटी

डिसेंबर 2022 मध्ये गोव्याला 460 कोटी जीएसटी प्राप्त झाला होता.

Pramod Yadav

Goa GST Revenue: गोव्याच्या जीएसटीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023 च्या डिसेंबरमध्ये गोव्याला 553 कोटी रुपये जीएसटीद्वारे मिळाले असून गेल्या वर्षीच्या जीएसटी महसुलाच्या तुलनेत हे प्रमाण 20 टक्के जास्त आहे.

पर्यटन क्षेत्रात (प्रामुख्याने लग्न सोहळे) झालेली वाढ, नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारच्या जीएसटीमध्ये 10 टक्के वाढ झाली.

डिसेंबर 2022 मध्ये गोव्याला 460 कोटी जीएसटी प्राप्त झाला होता. 2023 -24 या वर्षात एप्रिल ते डिसेंबर या काळात 1,685 कोटी जीएसटी प्राप्त झाला असून हे प्रमाण मागच्या वर्षाच्या तुलनेत 17 टक्के जास्त आहे.

2023 च्या एप्रिल ते डिसेंबर या काळात देशात जीएसटी करात 12 टक्के वाढ झाली असून, या कालावधीत 14.97 लाख कोटी जीएसटीच्या स्वरूपात देशाला प्राप्त झाले आहेत.

IGST च्या SGST सेटलमेंटनंतर, एप्रिल ते डिसेंबर दरम्यान गोव्याला कर महसूल म्हणून रु. 2,951 कोटी रुपये मिळाले. गेल्या वर्षीच्या याच काळातील महसुलाच्या ही रक्कम 13 टक्के अधिक आहे.

डिसेंबरचे जीएसटी संकलन नोव्हेंबर महिन्यासाठी भरलेल्या रिटर्न आणि भरलेल्या करावर आधारित आहे, हा कालावधी लग्नाचा हंगाम होता.

राष्ट्रीय स्तरावर, डिसेंबरसाठी एकूण GST महसूल रु. 1,64,882 कोटी होता, ज्यापैकी CGST रु. 30,443 कोटी, SGST रु. 37,935 कोटी, IGST रु. 84,255 कोटी आणि उपकर रु. 12,249 कोटी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT